Royal politicsटॉप पोस्ट

मायावती अशा काही बोलल्या की राहुल गांधी होऊ शकतात नाराज

0

विरोधक आता एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असताना बीएसपीच्या सर्वेसर्वा मायावतींनी देखील 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी गाठबंधन करणार असल्याचे संगितले आहे, पण ती गाठबंधन तेव्हाच होईल जेव्हा जागांचे योग्य वाटप होईल. आज त्यांनी याबद्दल दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत गाठबंधन करण्यासंबंधित  अनेक गोष्टीवर आपले मत मांडले.

त्यांनी या पत्रकार परिषदेत हे देखील स्पष्ट केले की, ‘काही कॉंग्रेसचे नेते छत्तीसगड, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश येथे होणार्‍या निवडणुकांबाबत बोलत असताना बहुजन समाजवादी पार्टी बरोबर च्या गाठबंधनाबद्दल वक्तव्य देत असतात. त्यांनी ते थांबवावे. सध्या महागटबंधांवर बर्‍याच चर्चा होत आहे.’ असे बोलत जागा वाटपा ठरवून गाठबंधन होईल असा इशारा मायावतींनी कॉंग्रेसला दिला. 

Loading...

असे असले तरी मायावती यांनी या वर्षी छत्तीसगड, मध्यप्रदेश राजस्थान येथे येऊ घातलेल्या निवडणुका सर्व जागांसह स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. आणि त्यासाठी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी करीत आहे.

यावेळी सध्या देशात वाढतच चाललेल्या माॅब लिंचिंग (जमावाकडून होणार्‍या हत्त्या) बद्दल देखील त्यांनी सरकार वर ताशेरे ओढले.  सध्या देशात माॅब लिंचिंग च्या अनेक घटना घडत आहे. आणि या विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची अत्यंत गरज आहे.

भाजप देशाची परिस्थिती बिघडवत आहे, केंद्रकडून जी आश्वासन देण्यात आली ती सत्यात आणण्यास ते अपयशी झाले आहेत. न्यायालयाला अनेक घटनांमध्ये मध्यस्थी करावी लागते.

एएनआय च्या रिपोर्ट नुसार मायावती राजस्थानातील अलवर येथील माॅब लिंचिंग  बद्दल म्हणल्या  की, भाजप देशातील माॅब लिंचिंगच्या घटनांचे समर्थन करतो. त्या म्हणल्या की भाजप च्या नेत्यांना ती देशभक्ती वाटते.  मी अलवर येथील घटनेचा निषेध करते, आणि मला याची कल्पना आहे की भाजप सरकार या घटनेबद्दल योग्य ती कारवाई करणार नाही. म्हणून मी न्यायालयाला या घटनेत हस्तक्षेप करावा अशी विनंती करते. 

त्या सरकार कसे असावे या बद्दल बोलताना म्हणल्या की, केंद्रातील सरकार नको जे मजबूत असेल, केंद्रात असे सरकार हवे ज्यांच्यावर अधिक जवाबदार्‍या असतील आणि दबाव असेल. जेणे करून सरकार जनतेची कामे करेल.

(PHOTO INPUT- FACEBOOK/BSP)

Loading...

देशात बेरोजगारीच्या प्रमाणत वाढ? जाणून घ्या काय आहे टक्केवारी

Previous article

उद्या होणाऱ्या पाकिस्तानमधील निवडणूकीविषयी जाणून घ्या सर्व माहिती

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *