Royal politicsट्रेंडिंगभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

#MeToo : लैगिंक शोषणाचे आरोप-प्रत्यारोप आणि वास्तव

0

सध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या आहेत. लैगिक शोषण हे फक्त बाँलिवुड मध्येच होते असे नव्हे , लैगिक शोषण बाँलिवुड पेक्षा राजकारणात सर्वाधिक होताना मी स्वता अनेकवेळा पाहिलय . बाँलिवुड , राजकारण , विविध शैक्षणीक संस्था चालक – मालक , प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी , विविध कार्पोरेट कंपन्या मधील बाँस, सावकाराचे अड्डे , तर कधी मंदिरात भर देवा समोरच पुजाऱ्याकडुन लैगिंक शोषण झाले म्हणून बातम्या येतात , तर कधी महिला पोलिस प्रक्षिणात , तर कधी सिनीअर डाँक्टर कडुन नर्स व ज्युनिअर डाँक्टरचे लैगिंक शोषण होते , तर कधी प्राध्यापकच आपल्या विद्यार्थीणीला अधिक गुण देण्याचे अमिष दाखवुन लैगिंक शोषण करतात , अशा विविध ठिकाणी लैगिक शोषणाचे बहुतांश वेळा प्रकार घडतात. पण बॉलीवूडचेच आरोप प्रत्याआरोप नेहमी गाजतात. याचं कारण ते हाय प्रोफाईल म्हणुन म्हणायला’ काहीच हरकत नाही.

राजकारणात बऱ्याचवेळा पदाच्या अमिषापुढे लैगिंक शोषण होते. तर बॉलीवूड मध्ये चंदेरी दुनियेत हिरोईन व्हायचंय या स्वप्नापुढे नाईलाजस्तव लैगिंक शोषणाला बळी पडतात. शिक्षण संस्थेत मालक चालक महिलांना कायम करतो , प्रमोशन करतो अशा थापा टाकुन लैगिंक शोषण करतात. तर कार्पोरेट कपंनीत देखील अशाच प्रकारे लैगिंक शोषण होते. सावकार या प्रकारात मात्र जबरदस्तीने शोषण झाल्याच्या अनेक बातम्या आपण स्वता वर्तमान पत्रातुन वाचल्या असतील. मध्यंतरी एका बँक अधिकाऱ्याने चक्का एका शेतकरी महिलेला शरिर सुखाची मागणी केली होती. हि धक्का देणारीच नव्हे तर महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला हादरा देणारी घटना होती. या सर्वांना एेवढा माजमस्ती का येतो याचं कारण आहे शासनकर्ते जेव्हा मुर्दांड असतात. स्वताच शासनकर्ते बेताल वक्तव्य करणारे  असतात आणि  शासनचा धाक जनतेवर बसवण्यात गृहखातं असक्षम असते तेव्हा अधिक मस्ती अशा लिंगपिसांटाना येते.

Loading...

गेल्या तीन वर्षापुर्वी लातुरात एका नामांकित पक्षाची जिल्हा अध्यक्षा असणारी सुदंर युवतीचा मृतदेह एका रोडच्या कडेला मिळाला. तिलाही अशाच राजकिय पदाच्या अमिषाला बळी पडावे लागले. मुळात महिला ही खुप हळव्या मनाची प्राणी आहे. आणि  पुरुष हा कठोर मनाचा आहे. हे मानसशास्त्राचा आधार घेऊन सागांवे वाटते. महिला एखाद्या अमिषाला लगेच बळी पडतात. म्हणुन तर देशात आसाराम, रामरहिम, रामपाल सारखे हरामी साधु-बापु-टापु निर्माण झाले.

एक काळ होता की य आसारामच्या आश्रमात लाखो महिलांची गर्दी होती. पण जेव्हा हा हारामी लैगिंक शोषणाकर्ता आहे असे  समजल्यावर पुर्ण देश पेटुन ऊठला. याची ऊदाहारणे एवढ्यासाठी  दिली की महिलांनी अमिषाला बळी पडु नये. कधी कधी टाऴी एकाच हाताने वाजते मग नाना व तनुश्री दत्ता सारखी धक्कादायक प्रकरणे घडतात. जे दिसतं तसं नसतं म्हणुनच याला जग फसतं ही म्हण अगदी योग्य आहे. आत्ता काही जण असंही म्हणतील की तनुश्री दत्ताने हे आरोप प्रसिध्दीसाठी केलेत. जर तनुश्री दत्ताला हे सर्व प्रसिध्दीसाठीच करायचे असते तर कदाचित तिने नाना पेक्षा अधिक प्रसिध्द असलेल्या व्यक्तीवर हे सर्व आरोप केले असते. कदाचित काही अशाही बोटावर मोजण्याएेवढ्या महिला आहेत की प्रसिध्दीसाठी अशा आरोप करतही असतील , पण हे प्रकरणात काही तरी तथ्य आहे.

आत्ता काही  मंडळी असं देखील बोलू लागले आहेत  की आत्ताच का आरोप केले ? लैगिंक शोषण झाले तेव्हाच का आरोप केले नाहीत? माझं यांना एकच ऊततर असेल थोडा वेळ तुम्ही त्या पिडीत तरुणीच्या जागी आपल्या बहिणीला गृहीत धरा अन मग विचार करा की आपल्या बहिणीने जर हे लैगिंक शोषणाचे प्रकरण बाहेर काढले तर समाज जगु देईल का ? हा समाज स्विकारेल का ? हा समाज विवाह होऊ देईल का ? , जर विवाह झालेला असेल तर सासरचे लोक बाहेर हाकलुन देतील ? नवरा संभाळेल का ? हा समाज बिहिष्कृत करेल का ? माझ्यावर आलेल्या प्रसंगामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी किती होईल. ? माझ्या नंतर लहान बहिण भावडांची लग्न होतीला का ? समाजात कोणत्या तोंडाने मी फिरणार ? कोर्टात गेले तर हि मिडीया साथ देईल का ? न्याय खरंच मिळेल का ? कारण आपल्या भारतात एका केस चा निकाल लागायला तब्बल 70 वर्ष जातात हे पाहिलंय , असे नाना प्रकारचे हाजारो प्रश्न त्या पिडीत तरुणीच्या मनात मुसळधार पाऊसात कडाकड विजा चमकाव्यात तसे पडत असतील. म्हणुन जेव्हा तिचं मन खबिंर होईल तिला या समाजाची भिती नसेल तेव्हा तिच्यावर झालेल्या प्रसंगाला वाचा फोडणारच …. ऊलट अशा वेळी समाजाने अशा पिडीतांच्या पाठिशी खंबिर पणे ऊभा राहिले पाहिजे अन लिंगपिसाट विकृत प्रवृत्तीला संस्कृतीमधुन हाकलेले पाहिजे.

आज महिलांचा ऊत्सावाचा सण आहे. नवरात्रात नऊ रंग पाहण्यापेक्षा नवरात्रात गर्भात मारले जाणाऱ्या कळीला वाचवा , हुंड्यावाचुन जिवंत सुनेला जाळणाऱ्या विकृतीला ठेचा , लैगिंक शोषणाच्या पिसाटांना रावणदहण एेवजी अशा विकृतीचे दहन  केले पाहिजे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहान दिले पाहिजे. मुली व महिलांनी नऊ दिवस ऊपवास करित बसणयापेक्षा नऊ दिवस प्रबोधनाचा ऊत्सव करावा त्यात जिजाऊ-सावित्री-अहिल्या-महाराणी ताराराणी यांचा इतिहासाचे वाचन करावे.

सध्याच्या लैगिंक शोषणाच्या प्रकरणावर पुन्हा एकदा एकच सांगेन की यात तथ्य नक्कीच आहे. भारतीय न्यायव्यवस्था न्याय देण्यासाठी मजबुत आहे. सोशलमिडीयावर या संदर्भात पोस्ट करताना थोडं सामाजिक भान ठेवुन पोस्ट कराव्यात. अनेकांनी तनुश्री दत्ता व इमरान हाश्मीचे फोटो पोस्ट केले. कोणी सनीवर विनोद जोक तयार करुन पोस्ट केली. शरिरसुख हे समंती ने घेणे अन बळजबरीने घेणे यात खुप फरख आहे. प्रश्न येथे दनुश्री दत्ताच्या हाँट सिन चा नव्हे तर शोषणाचा आहे. तसं पाहिल तर नाना पाटेकर ने देखील कित्येक चित्रपटात खलनायकाच्या अन स्त्रीच्या काष्ट्याला हात घालणाऱ्या भुमिका केल्यात मग त्या चित्रपटातिल भुमिकेवरुन तुम्ही वास्तवातील जिवनावर डाग लावणार का ? चित्रपटात हा सिन येणे व वास्तवातलं खुप वेगळं आहे. सनि लियोनवर जोक टाकताना तिच्या सामाजिक कार्याचं देखील पोस्ट केली तर बरं वाटेल. कारण सनीने आत्तापर्यंत कित्येक लहान रस्त्यावरिल सोडलेल्या मुलं मुली संभाळायला दत्तक घेतल्या आहेत. हे कार्य पोस्ट करणारे करतील का ?

लैगिंक शोषण हि प्रकरणे ऊजेडात आल्यावर एकच ऊदाहरण  देईन की यावर्षी ज्या नादिया मुराद नावाच्या तरुणीला नोबेल पुरस्काराने गौरवले तिच्या चरित्रावर एकदा नजर सर्व स्त्रियांनी टाकली पाहिजे. तिच्याकडुन बरचं काही घेण्यासारखं आहे. बाकी नाना, अलोक आसाराम, रामरहिम यांना भारतीय न्यायव्यवस्था बघुन घेईल . यांचे वकिलपत्र फेसबुक्यांनी चालवण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे तिचा सन्मान झाला पाहिजे. मग ती स्त्री गैरमुलखातील असो ! ना कुण्या शत्रुची असो ! तिला सन्मानाची वागणुक द्या
– हर्षल बागल (व्याख्याते व पत्रकार)

कामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते – सनी लिऑन

पुण्यात चिमुरडीवर ६ जणांनी केला गँगरेप; ६ मधील ५ अल्पवयीन

Loading...

पाकिस्तानात भाषा कधीच बदलत नाही; मात्र दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला त्यांची भाषा शिकावी लागते- नवजोत सिंग सिद्धू

Previous article

भाजपने कितीही चेटूकगिरी केली तरीही राफेलचे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही : सामना

Next article

You may also like

Comments

Comments are closed.