Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

‘या’ मुद्द्यावरून सुरु आहे पुणे कॉंग्रेसमध्ये यादवी

0

टीम महाराष्ट्र देशा : पुणे शहरात एकेकाळी कॉंग्रेसच राज्य होत. पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ सुरेश कलमाडी यांच्या हातात पुण्यातील सत्ता होती. मात्र, सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि कॉंग्रेसला घर घर लागायला सुरवात झाली. आता तर कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीचे इतके ग्रहण लागले आहे की या पक्षात कोणीच कोणाला जुमानत नसल्याच चित्र आहे.

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत असलेली हि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कॉंग्रेसमधील एका गटाने तर शहराध्यक्ष बदलण्यासाठी थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनलबेन पटेल यांनाच गळ घातली आहे. माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी कॉंग्रेसचा एक गट आता चांगलाच सरसावला आहे.

Loading...

पक्षात एकवाक्यता नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीत पक्षाला नेत्यांच्या तू तू मै मै चा फटका बसत आहे. पक्षात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वैयक्तिक स्पर्धा तीव्र झाली आहे. पर्वतीमध्ये प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि नगरसेवक, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. शिवाजीनगरमध्ये माजी आमदार दीप्ती चवधरी आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्यातील स्पर्धा संघर्ष यात्रेच्या निमित्तानेही पुढे आली.

कसब्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काँग्रेसमध्ये आलेले रवींद्र धंगेकर, महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे आणि रोहित टिळक यांच्यात एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हडपसरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि शिवाजी केदारी यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पुणे कॅन्टोन्मेंटमधून सदानंद शेट्टी आव्हान देत आहेत.

काँग्रेसच्या राज्याच्या प्रभारी सोनलबेन पटेल यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. शहर काँग्रेससंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र, शहराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्यात आली नाही, असा दावा मात्र त्यांनी केला.

विनायक निम्हण यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत रमेश बागवेंचे कानावर हात

Loading...

भाजपच्या वेबसाईटवर चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा

Previous article

पक्ष बदलण्यासंदर्भात आ.भारत भालके यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.