Royal Entertainmentमुख्य बातम्या

अलिबाबाशी संबंधित ई कॉमर्स कंपनी धोकादायक

0

चीनशी संबंध तोडण्याची तैवानकडून कंपनीला सूचना
तैपेई, (तैवान) – चीनच्या अलिबाबा समूहाशी संबंधित ई कॉमर्स कंपनीला तैवानने सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक घोषित केले आहे. चीनच्या मुख्य भूमीशी आपले मूळचे नातेसंबंध तोडून टाकावेत आणि तैवानमध्ये नव्याने कंपनीची नोंदणी करावी, अशी सूचना ताओबाओ तैवान या कंपनीला केली आहे.
ताओबाओ तैवान या कंपनीवर ब्रिटीश क्‍लॅडग व्हेंचर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या स्वतंत्र कंपनीचे नियंत्रण आहे. मात्र अलिबाबा समूहाचा या कंपनीमध्ये वाटा असल्यामुळे तैवानच्या नियमांचा भंग होतो आहे, असे आर्थिक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
ताओबाओ तैवानबरोबरच्या करारानुसार ग्राहकांची माहिती अलिबाबा समूहाच्या चीनमधील सर्व्हरकडे पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेला धोका पोचत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
ब्रिटीश क्‍लॅडगला चीनी कंपनी म्हणून काम करण्यास परवानगी मागण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. अन्यथा गुंतवणूक काढून घेण्यास तैवानच्या मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या नोंदणीनंतर कंपनीला काम सुरू ठेवता येईल. पण तसे केले नाही तर कंपनीला 4,10,000 तैवान डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.
The post अलिबाबाशी संबंधित ई कॉमर्स कंपनी धोकादायक appeared first on Dainik Prabhat.

गुगल पे कडून नियमांचा भंग झाल्याची तक्रार

Previous article

थायलंडमध्ये 10 लाख फेसबुक अकाऊंट ब्लॉक

Next article

You may also like

Comments

Comments are closed.