मुख्य बातम्या

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !

0

आगामी काही दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागांतील खरीप पिकांचे नुकसान होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नजीकच्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यासह दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.  अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आल्याने मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान आणि वित्तहानी झाली आहे.
औरंगाबादमध्ये तर गुरुवारी रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला. यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक मुसळधार पाऊस मानला जात आहे. तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या १००.८ टक्के पाऊस झालाय. औरंगाबादेत यावर्षी १३७ टक्के पाऊस झालाय. मराठवाड्याची सरासरी ६७९ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ५८५ मिमी पाऊस झाला.
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा ! InShorts Marathi.

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ; ठाकरे सरकारच्या कारभारावरून भाजपाची टीका

Previous article

एसटीतल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी अनिल परब घेणार आहेत का? मनसेचा थेट सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.