Royal Entertainmentमुख्य बातम्या

बेयर ग्रिल्ससोबत अक्षय कुमारचा साहसी प्रवास

0

बॉलीवूडमधील “खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार लवरकच ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’मध्ये खतरनाक खेळ खेळताना दिसणार आहे. याबाबत खुद्‌द अक्षय कुमारने सोशल मीडियावर शोचा टीझर शेअर करत माहिती दिली होती. आता या शोचा एक शॉर्ट व्हिडिओ त्याने आपल्या ट्‌विटरवर शेअर केला आहे.
या एका मिनिटाच्या व्हिडिओत अक्षय कुमार हा बेयर ग्रिल्ससोबत एका साहसी प्रवासावर जात असल्याचे दिसते. “इंटू द वाइल्ड”चा हा विशेष एपिसोड खूप काही दाखविण्यात येणार असून तो 11 सप्टेंबर रोजी डिस्कवरी चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे. याबाबत अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला ‘इंटू द वाइल्ड’मध्ये सहभागी होण्यापूर्वीच येथील धोकादायक आव्हानांची कल्पना आली होती, परंतु बेयर ग्रिल्सने ‘एश्रशहिरपीं झे ढिशर’ मध्ये मला रोमांचितच केले होते. काय तो दिवस होता.

I visualized stiff challenges prior to #IntoTheWildWithBearGrylls but @bearGrylls completely surprised me with the elephant poop tea @DiscoveryIn @DiscoveryPlusIn pic.twitter.com/m6YfQXmCcM
— Akshay Kumar (@akshaykumar) August 31, 2020

या व्हिडिओत हे दोन कलाकार जंगलात कुठेतरी फिरत असतात, तर कधी दोरखंडावर लटकलेले दिसतात. एवढेच नव्हे तर हे अक्षय आणि बेयर ग्रिल्स हे दोघेजण जंगलात चहा पिताना दिसत आहे. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे हा चहा हातीच्या दुधापासून बनविलेला आहे. हा चहा अक्षय पिताना दिसतो, तर बेयर ग्रिल्स हा चहा गुपचूप फेकून देतो. या व्हिडिओत अक्षय कुमारसोबत बेयर ग्रिल्सचाही अंदाज खूपच जबरदस्त असल्याचे दिसून येते.
The post बेयर ग्रिल्ससोबत अक्षय कुमारचा साहसी प्रवास appeared first on Dainik Prabhat.

विरुष्काला रणवीर सिंहच्या खास शुभेच्छा

Previous article

‘बैंग बैंग-द साउंड ऑफ क्राइम्स’चा टीजर प्रदर्शित!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.