Royal Entertainmentमुख्य बातम्या

अक्षय कुमारने लाईव शोमध्ये केला खुलासा, म्हणाला – रोज पितो गोमुत्र, हत्तीच्या शेणापासून बनलेला चहा पिण्यास झाला नाही कोणताही त्रास

0

बॉलीवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमार लवकरच इनटू द वाइल्ड विद बियर ग्रिल्स शोमध्ये पाहायला मिळणार आहे. शोचा प्रोमो देखील जारी करण्यात आला होता, जो लोकांना खूपच पसंत आला होता. अक्षय सोबत शोचा होस्ट बेयर ग्रिल्सदेखील दिसणार आहे. अक्षयने इन टू द वाइल्ड च्या विशेष एपिसोडबद्दल अॅचडव्हेंचरर आणि टीव्ही होस्ट बेयर ग्रिल्ससोबत इंस्टाग्रामवर एक लाईव सेशन केला होता. या मध्ये बेल बॉटम चित्रपटामधील को-स्टार हुमा कुरैशी देखील जोडली गेली होती. अक्षयने लाईवदरम्यान शोमध्ये येणाऱ्या आव्हानांविषयी बरेच काही सांगितले.यादरम्यान हुमा कुरैशीने अक्षयला विचारले कि त्याने हत्तीच्या शेणापासून बनलेला चहा पिण्यासाठी स्वतःला कसे तयार केले? यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला कि मला कोणतीच समस्या जाणवली नाही. मला उलट मजा आली. मी प्रत्येक दिवशी आयुर्वेदिक फायद्यांसाठी गोमुत्र पितो. तर माझ्यासाठी हि फार मोठी गोष्ट नव्हती. लाईव चॅटमध्ये बेयर ग्रिल्सने अक्षय कुमारचे खूपच कौतुक केले आणि म्हटले कि जेव्हा लोक फेमस होतात तेव्हा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करणे बंद करतात कारण त्यांना कमजोर दिसण्याची भीती वाटते.

 

View this post on Instagram

 
@beargrylls @iamhumaq @discoveryplusindia @discoverychannelin
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on Sep 10, 2020 at 2:06am PDT

पण अक्षय असा नाही तो प्रत्येक गोष्टीसाठी तयर होता. रणवीर सिंहने देखील लाईवदरम्यान अक्षयला विश केले आणि लिहिले कि त्याच्या मिश्या एकदम कडक दिसत आहेत. यावर अक्षय म्हणाला कि त्याच्या कुटुंबाला हे पसंत नाही पण तरीही त्याने वाढवल्या आहेत.
अक्षय ग्रील्ससोबत कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्व येथे एक साहसी सहलीवर गेला होता, जिथे इनटू द वाइल्ड विद बीयर ग्रिल्स च्या एका एपिसोडची शुटींग केली गेली. ज्याला ११ सप्टेंबर रोजी डिस्कवरी प्लसवर प्रसारित केले गेले आहे. सध्या अक्षय कुमार या दिवसांमध्ये आपल्या आगामी बेल बॉटम चित्रपटाच्या शुटींगसाठी स्कॉटलंडला गेला आहे. चित्रपटामध्ये त्याच्याशिवाय लारा दत्ता, हुमा कुरैशी आणि वाणी कपूर देखील आहे.
The post अक्षय कुमारने लाईव शोमध्ये केला खुलासा, म्हणाला – रोज पितो गोमुत्र, हत्तीच्या शेणापासून बनलेला चहा पिण्यास झाला नाही कोणताही त्रास appeared first on Yesमराठी.

बॉलिवूड मधला या ‘खतरनाक’ खलनायकाशी रेणुका शहाणे यांनी केलंय लग्न, नवर्यापेक्षा 2 वर्षाने मोठ्या आहेत रेणुका शहाणे

Previous article

अक्षय कुमारने लाईव शोमध्ये केला खुलासा, म्हणाला – रोज पितो गोमुत्र, हत्तीच्या शेणापासून बनलेला चहा पिण्यास झाला नाही कोणताही त्रास

Next article

You may also like

Comments

Comments are closed.