मुख्य बातम्या

पुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात अजित पवारांनी तातडीने दिले कडक आदेश

0

जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी इथली परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून इथल्या बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे.

महत्वाच्या बातम्या :-

केंद्र सरकारकडून राज्याला २२,५३४ कोटी रुपये येणे बाकी – अजित पवार
हाताला काम द्या खिशाला दाम द्या ; कलाकारांच्या वतीने पुण्यात आंदोलन
24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात अजित पवारांनी तातडीने दिले कडक आदेश InShorts Marathi.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

Previous article

कॉंग्रेसच्या नेत्यांना मराठा आरक्षण नको होतं ; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.