Royal politicsटॉप पोस्टमुख्य बातम्या

पूनम महाजन, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्यानं का मारलं?, अजित पवारांचा सवाल

0

पूनम महाजन यांनी शरद पवार हे शकुनी मामा आहेत, अशी टीका केली होती. खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. ‘तुम्हाला बोलता येतं, तसं आम्हाला ही बोलता येतं, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्यानं का मारलं? हे महाभारत कसं घडलं? कशामुळे घडलं हे विचारलं तर?, असे सवाल करत अजित पवार यांनी पूनम महाजनांवर टीका केली.

आपलं वय काय, आपली राजकीय कारकीर्द किती, पवारसाहेब आणि प्रमोद महाजनांचे संबंध कसे होते आणि या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा द्यायला निघाल्या. तुमची औकात काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्यावं असं सांगताना जर आम्ही म्हटलं की तुझ्या बापाला चुलत्याने का मारलं? काय उत्तर आहे.

Loading...

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

आपली राजकीय कारकीर्द किती? आपण बोलतो किती? याचं भान न ठेवता पूनम महाजन यांनी आमच्या दैवतावर टीका केली. महाजन कुटुंबात भलं मोठं महाभारत का घडलं. याचं उत्तर त्यांना देता येईल का? असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही पातळी सोडत नाही, याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असं समजू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी संस्था पुरस्कार जाहीर

Previous article

राज्यात मागील तीन महिन्यात वनहक्काच्या ४३ हजारहून अधिक प्रकरणांना मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.