मुख्य बातम्या

अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ

0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यासाठी ते सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाच्या ठिकाणच्या पोहचले. त्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोकडून सुरू आहे. यातील पुणे स्टेशन येथील सुरू असलेल्या कामाची माहिती अजित पवार यांनी घेतली. दरम्यान, अजित पवार येणार म्हटल्यावर मेट्रोचे अधिकारीदेखील झाडून उपस्थित होते.

मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेननं प्रवास केला. यासह शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाजवळील बोगद्याचं काम, व्हील पार्क (वनाज) येथील कचरा डेपोचं अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या कामाची देखील पाहणी केली. pic.twitter.com/49ltTUsFIp
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 25, 2020

कोरोना संकट काळात मेट्रो काम बंद होते. आता कामगार संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, स्टेशन कशी असणार, पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का? यांची केली पाहणी केली. तसेच, सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही, असे असताना या कामाला गती कशी देता येईल याविषयीची चर्चा अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत केल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या :-

अहमदनगरमध्ये राजकीय खळबळ ; सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो पण आता सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे
OBC आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास… ; OBC समाजाचा राज्य सरकारला इशारा
मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल
जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अजितदादांच्या कामाचा पुन्हा भल्या पहाटे दणका ; मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ InShorts Marathi.

काश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा ; शिवसेनेची भाजपवर टीका

Previous article

बिहारचे डीजीपी भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे ; गृहमंत्र्यांची खोचक टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.