मुख्य बातम्या

सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजितदादांकडे !

0

राज्य सरकारने आज GR जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वड्डेटीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वड्डेटीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारितील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर आज यासंदर्भात जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या इतर योजनांची जबाबदारीही अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.
मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ‘सारथी’ संस्थेचा मुद्दा चर्चेत होता. मात्र आता सारथीची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हातात घेतली आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत
आंदोलनावरुन संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका, म्हणतात…
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर अजितदादांकडे ! InShorts Marathi.

Loading...

शीर धडावेगळं झालं तरी चालेल पण ते कधीही झुकणार नाही ; कंगना रनौत कडाडली

Previous article

कोरोनाच्या महासंकटात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या दारातच आणली शाळा , वाचून व्हाल हैराण

Next article

You may also like

Comments

Comments are closed.