Royal politicsमुख्य बातम्या

‘राम मंदिर नाही तर मत नाही’, या घोषणेसह पुढील आंदोलन करणार – प्रवीण तोगडिया

0

‘राम मंदिर नाही तर मत नाही’ या घोषणेसह पुढील आंदोलन होईल, अशा कडक शब्दात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडियांनी यांनी सत्ताधारी मोदी सरकारला इशारा दिला.

मागील 32 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच मुद्यावरुन राम मंदिरासाठी आंदोलन करत होते. परंतू हेच लोक बहुमताने सत्तेत येऊन देखील राम मंदिराचे दर्शन घेता आले नाही असा टोला देखील यांनी भाजपला लगावला. भाजपने संसदेत कायदा बनवून राम मंदिर उभे करावे, नाहीतर आम्ही दुसरे मुख्यमंत्री शोधू असे देखील ते म्हणाले.

Loading...

योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आम्हाला अयोध्येत येण्यापासून योगी सकरकडून रोखण्यात आले. आमच्या समर्थकांच्या जेवणाचे साहित्य असलेला ट्रक देखील रोखला गेला, असे ‘मुलायम’ यांच्या कार्यकाळातही होत नव्हते.

दिल्लीत 500 कोटींचे कार्यालय भाजपने उभा केले आहे. पण रामललाला अजून जागा नाही. अशी देखील टीका त्यांनी भाजपवर केली.

मोदींनी काँग्रेसमुक्त नव्हे, भाजपाला काँग्रेसयुक्त –

पंतप्रधान मोदींवर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेस मुक्त भारत करण्याची घोषणा देत असताना भाजपालाच मोदींनी काँग्रेस युक्त केले आहे. काँग्रेसचा कचरा, ज्यांना कॉंग्रेसमध्ये कोणीही विचारत नव्हते, त्यांना भाजपमध्ये आणून मोठमोठ्या पदांवर नेऊन बसवण्यात आले. खरे भाजप कार्यकर्ते अजूनही राम मंदिरचे स्वप्न पाहत रडत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारचे राम मंदिर उभारण्याचे वचन एक ‘जुमला’ असल्याचे ते म्हणाले.

 


हे ही वाचा – 

#MeToo प्रकरणी पुण्यातील सिंम्बायोसिसमधील दोन प्राध्यापक निलंबित

मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे नाहीच; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे, वंचित समाजाने वेळीच एकत्र यावे – प्रकाश आंबेडकर


 

Loading...

#MeToo प्रकरणी पुण्यातील सिंम्बायोसिसमधील दोन प्राध्यापक निलंबित

Previous article

रसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *