मुख्य बातम्या

राम मंदिर भूमिपुजनानंतर अयोध्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला ; तिथल्या जागांचे दर गगनाला भिडले

0

बहुप्रतिक्षित अशा अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरासाठीचं भूमीपुजन संपन्न झाल्यानंतर अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं दिवस पालटल्याचं पाहायला मिळालं. याचाच प्रत्यय आला, अयोध्या नगरीकडे साऱ्या जगाच्या पाहण्याच्या बदललेल्या दृष्टीकोनातून, शिवाय येथील भूखंडांच्या दरातून.
ऑगस्ट महिन्यात अयोध्येमध्ये राम मंदिर भूमीपुजन पार पडल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच येथील भूखंडाचे दर दुपटीनं वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं सदर खटल्यातील ऐतिहासिक निर्णयाची सुनावणी केल्यानंतरच्या काळापासूनच अय़ोध्येतील भूखंडांच्या दरांमध्ये जवळपास ३०-४० टक्क्यांची वाढ झाल्याचं निरिक्षण केलं गेलं.
फक्त अयोध्याच नव्हे, तर त्या आजुबाजूच्या परिसरातही भूखंडाचे दर, प्रति चौरस फूटामागे १०००-१५०० रुपयांनी वाढले. तर, मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागांच्या दरात प्रति चौरस फूट तब्बल ३००० हून अधिक रुपयांची मोठी वाढ झाल्याचं वृत्तं आहे. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे या भागात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी भूखंडांचे दर जवळपास प्रति चौरस फूट ९०० रुपयांच्या घरात होते.
महत्वाच्या बातम्या :-

कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला ; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाली…
आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
राज्यात लवकर मंदिर उघडावीत नाहीतर… ; राज ठाकरे सरकारवर कडाडले
मास्क न घालणे,धुमप्रान करणे राज ठाकरेंना पडले महागात ; अधिकाऱ्यांनी घेतली ‘ही’ अॅक्शन
राज ठाकरे यांच्या लूकमध्ये मोठा बदल ; समोर आला नवीन लुक

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राम मंदिर भूमिपुजनानंतर अयोध्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला ; तिथल्या जागांचे दर गगनाला भिडले InShorts Marathi.

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्यास काय हरकत आहे? – रोहित पवार

Previous article

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षामध्ये झाला मोठा बदल ; यंदा १ नोव्हेंबर ते २९ ऑगस्ट असणार वर्ष

Next article

You may also like

Comments

Comments are closed.