Royal Entertainmentमुख्य बातम्या

#MeToo :- हाऊसफुल्ल 4 चे शुटींग रद्द; दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप

0

साजिद खानचा मॅड कॉमेडी सिनेमा हाऊसफुल्ल 4 #MeToo मध्ये अडकला आहे. दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय,  अभिनेत्री रिचेल व्हाईट यांनी साजिदवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला.

बॉलीवुडमध्ये सध्या #MeToo ची भलतीच चर्चा आहे. नाना पाटेकरवर तनुश्री दत्ता कडून करण्यात आलेल्या आरोपानंतर मात्र बॉलीवुड हादरले आहे. #MeToo पासून अनेक अभिनेत्रींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगण्यासाठी समोर आल्या. हाऊसफुल्ल 4 या सिनेमाबाबत हाच प्रकार समोर आल्याने आता सिनेमाच शुटींग बंद करण्याची वेळ आली आहे.

Loading...

अभिनेता अक्षय कुमारने देखील साजिद खानच्या सिनेमात काम करण्यास आता नकार दिला आहे. त्याने  ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं शुटींग तातडीनं बंद करावी अशी मागणी देखील केली. ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत त्यांच्या बरोबर मी काम करणार नसल्याचे त्याने संगितले.

हाऊसफुल्ल 4 या सिनेमात लैंगिक शोषणाचा आरोप असलेले साजिद आणि नाना पाटेकर यांचा समावेश आहे.

साजिदकडून आरोपाचे खंडन- 

साजिदने देखील ट्विट करत हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आता नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल 4 चे दिग्दर्शन करणार नसल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यामुळे माझ्या कुटुंबावरदेखील दबाव वाढत आहे,  माझ्यावरचे  आरोप खोटे असल्याचं मी सिद्ध करेन. लोकांना ही लवकरच सत्य कळेल. परंतू तोपर्यंत माझ्याविषयी कोणतंही मत तयार करून गैरसमज करू नका’ असे देखील तो ट्विटमध्ये म्हणाला.

Loading...

संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख,‘सर्व शिक्षा अभियाना’चे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

Previous article

फँड्री आणि सैराटच्या अभुतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहेत…

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *