Royal Entertainmentटॉप पोस्ट

लई भारी नंतर रितेश देशमुख चा हा नवा मराठी चित्रपट होतोय रिलीज, पहा फर्स्ट लुक

0

‘माऊली माऊली…’  हे लई भारी या गाजलेल्या चित्रपटातील गाणं आज देखील आपल्या ओठावर असताना आता या ‘माऊली’ नावचाच मराठी चित्रपट रितेश देशमुख घेऊन येत आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती देणारे ट्विट रितेशने आपल्या ट्वीटर अकाऊंट वरून केले आहे. माऊली हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई फ्लिम कंपनी आणि हिंदुस्तान टाॅकीज  निर्मित माऊली या चित्रपटाचे नवीन लुक असलेले पोस्टर रितेश देशमुखकडून ट्विट करण्यात आले आहे. हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आला आहे. अजय – अतुल या अफलातून जोडीने संगीत दिले आहे.

Loading...

या आधी अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटात असलेला लुक चा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंट वर टाकत रितेश इन हिज कूल मुच #माऊली असे लिहीत शेअर केला आहे. ज्यात रितेश आपल्या मिशीला ताव मारत आहे.

(PHOTO INPUT- FACEBOOK/Riteish Deshmukh)

Loading...

देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत आणि सरकार गाई वाचवायला निघालय- उद्धव ठाकरे

Previous article

OPINION | आरक्षणाच्या धोरणांचा पुनर्विचार केला गेला पाहिजे का ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *