मुख्य बातम्या

कांद्याला थोडा भाव मिळाल्यावर केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला ; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

0

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
“आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे. म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे”, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो ही कांदा चाळीत सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिला. त्याला आता समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही. त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील”, अशी भीती संदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

Loading...

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कांद्याला थोडा भाव मिळाल्यावर केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला ; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट InShorts Marathi.

Loading...

कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी राजा चिडला ; महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांकडून रास्तारोको

Previous article

शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात मग मराठा आरक्षणावर अजून गप्प का? नीलेश राणेंचा थेट सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.