Royal Entertainmentटॉप पोस्ट

‘क्वांटिको’मध्ये दाखवण्यात आलेल्या हिंदू दहशतवादाच्या दृश्यांबद्दल एबीसी स्टुडिओकडून माफी

0

गुन्हेगारी घटनांवर आधारित असलेल्या क्वांटिको या हॉलीवुडच्या मालिकेत दाखवण्यात आलेल्या घटनांमुळे सोशल मीडियावर या मालिकेवर नेटीजन्सने बरीच टीका केली. शेवटी यूएस च्या एबीसी स्टुडिओ ला भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागली. या मालिकेत भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अॅलेक्स पॅरीश ची भूमिका निभावत आहे.

नक्की काय होते ‘त्या’ सीन मध्ये

Loading...

1 जूनला ‘द ब्लड ऑफ रोमिओ’ हा एपिसोड प्रकाशित झाला होता. ज्यात प्रियांका चोप्रा एफबीआय एजेंट ची भूमिका निभावत होती. ज्यात इंडो – पाक समिट च्या काही दिवस आधी ती दहशतवादी साखळी मोडून काढते. ती करत असलेल्या चौकशीदरम्यान तिला एका संशयिताच्या गळ्यात रुद्राक्ष (हिंदू धार्मिकचे प्रतीक) दिसतो. यावरून निष्कर्ष काढला जातो की भारतीय राष्ट्रवाद्यांनी पाकिस्तानाला परमाणु दहशतवादी हल्ल्यात अडकविण्यासाठी ही दहशतवाद्यांची साखळी बनवली होती.

या एपिसोड नंतर सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ झाला, ती हा सीन करण्यास तयारच कशी झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून तिला विचारण्यात आला आहे. ती जे काम करते आणि ती ज्या सॅमसंग मोबाइल फोन चे ब्रंडिंग करते त्याचावर बहिष्कार टाकला जावा असे तिच्या चाहत्यांकडून बोलले जात आहे.

एबीसी स्टुडिओ कडून याचे स्पष्टीकरण देताना संगितले की, एबीसी आणि क्वांटिको चे निर्माते यांच्या वतीने आम्ही ‘द ब्लड ऑफ रोमिओ’ या प्रकरणाबद्दल प्रेक्षकांची माफी मागत आहोत. या प्रकरणामुळे प्रियांका चोप्रा बद्दल बराच संताप व्यक्त करण्यात आला आहे. परंतु ती ही मालिका तयार करीत नाही, ती लिहीत नाही किवा ती दिग्दर्शित करीत नाही. मालिकेच्या स्टोरीलाइन मध्ये आणि कास्टिंग मध्ये ती सहभागी नसते.

एबीसीने हेही स्पष्ट केले की “क्वंटिको ही काल्पनिक स्वरूपाची कथा आहे. परंतु या प्रकरणात आम्ही अनपेक्षितआणि गंभीररीत्या एक जटिल राजकीय विषय हाताळत होतो. यात कोणाच्याही भावना दुखावणे हा आमचा हेतू नव्हता.”

क्वांटिको चा हा 3 रा आणि शेवटचा भाग आहे.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/QUANTICO)

Loading...

वाह रे बिहार बोर्ड ! विद्यार्थ्याला दिले 35 पैकी 38 मार्क

Previous article

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उभे करणार 543 महिला उमेदवार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *