खेळटॉप पोस्ट

अफगाणिस्तानची बांगलादेशवर मात, मालिकेत विजयी आघाडी

0

देहरादून (उत्तराखंड) :-

राशिद खानची जादूयी फिरकी व समीउल्हा शेनवारीच्या शानदार बॅटिगच्या जोरावर अफगाणिस्तानने आज देहरादून येथे सुरू असलेल्या टि20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करत 2-0ने मालिकेत विजयी आघाडी घेतली.

Loading...

प्रथम बॅटिंग करताना बांगलादेशची सुरुवात अडखळतच झाली. दुसऱ्याच ओव्हरला लिटोन दास याच्या रुपात त्यांनी पहिली विकेट गमावली.  त्यांनतर मात्र तमीम इक्बालने एका बाजूने डाव सावरत बांगलादेशचा स्कोर 20 ओव्हरमध्ये 134 रन्सपर्यंत पोहचवला. तमीम इक्बालने 48 चेंडूत 5 चौकारांच्या साह्याने 43 रन्स केले. तसेच मुशफिकूर रहिमने 22 व अबू रोनीने 21 रन्स केले.

अफगाणिस्तानतर्फे राशिद खानने 4 ओव्हरमध्ये केवळ 12 रन देत बांगलादेशच्या 4 खेळाडूंना माघारी पाठवले. तर मोहम्मद नाबीने 2 व शापूर झादरान व करीम जन्नतने प्रत्येकी एक विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली.

अफगाणिस्तानच्या समीउल्हा शेनवारी 49 रन्स करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच मोहम्मद नाबीने नाबाद 31 रन्स करत विजयात मोलाची भुमिका बजावली.

दोन्ही संघामधील तिसरा व अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे.

स्कोरबोर्ड: –

बांगलादेश – 20 ओव्हर 8 विकेट 134 रन्स   (तमीम इक्बाल  43, मुशफिकूर रहिम 22, अबू रोनी 21, राशिद खान 4  विकेट, मोहम्मद नाबी 2 विकेट )

अफगाणिस्तान – 18.5 ओव्हर 4 विकेट 135 रन्स  (समीउल्हा शेनवारी 49 , मोहम्मद नाबी 31 नाबाद , मोसादेक हुसैन 2 विकेट)

(PHOTO INPUT : FACEBOOK/AFGANISTHANCRICKET)

Loading...

POEM : स्वच्छ नि सुंदर हरित भारत

Previous article

‘धोनी सारखे आमच्याकडे 11 खेळाडू, प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट निघू शकतो’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ