खेळटॉप पोस्ट

अफगाणिस्तानचा बांगलादेशला व्हाइट वाॅश, अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशवर 1 रनने मात

0

देहरादून (उत्तराखंड) :-

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशचा 1 रनाने पराभव केला. या विजयाबरोबरच अफगाणिस्तान संघाने मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. उत्कृष्ट फिल्डिंगच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने ही मॅच जिंकली. या मॅचमध्ये अफगाणिस्तान संघाने बांगलादेशच्या तीन खेळाडूंना रन आउट केले.

Loading...

आधीच 2-0 ने आघाडीवर असलेल्या अफगाणिस्तान संघाने तिसऱ्या व अखेरच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेटे्स गमावत  145 रन्स केले . अफगाणिस्तानच्या डावाची सुरूवात चांगली झाली. मोहम्मद शहजाद व उस्मान घानी या जोडीने पहिल्या विकेटसाठी 55 धावांची पार्टनरशीप करत संघाला चांगली सुरूवात करून दिली.

अफगाणिस्तानतर्फे समीउल्हा शेनवारीने 28 बाॅलमध्ये नाबाद 33 रन्स केले तर कॅप्टन असगर स्टॅनिंझाईने स्फोटक बॅटिंग करत 17 बाॅलमध्ये 3 सिक्सच्या साह्याने 27 धावा केल्या .

बांगलादेशतर्फे नजमूल इस्लाम व अबू जायेदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर शाकिब अल् हसन व अरिफुल हकने प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.

145 रन्सचा पाठलाग करण्यास मैदानात उतरेल्या बांगलादेश संघाची सुरूवात खराब झाली.  तिसऱ्याच ओव्हरमध्ये तमीम इक्बालच्या रूपात त्यांची पहिली विकेट गेली. मुशफिकूर रहीम व महमुदुल्ला या जोडीने 5व्या विकेटसाठी 84 रन्सची महत्वपुर्ण भागीदारी केली. पण त्यांची झुंज संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुशफिकूर रहीमने 46 रन्स व महमुदुल्लाने 45 रन्स केले.

अखेरच्या ओव्हरमध्ये  9 रन हवे असताना राशिद खानच्या बाॅलिंग समोर बांगलादेशचा संघ टिकू शकला नाही व त्यांनी अखेरच्या ओव्हरमध्ये केवळ 7 रन केले, त्यामुळे त्यांना केवळ 1 रनने पराभव स्विकारावा लागला.

तसेच राशिद खानला मॅन आॅफ द सिरीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने तीन मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या.

स्कोरबोर्ड: –

अफगाणिस्तान – 20 ओव्हर 6 विकेट 145 रन्स  (समीउल्हा शेनवारी 33 नाबाद , असगर स्टॅनिंझाई 27, नजमूल इस्लाम 2 विकेट, अबू जायेदने  2  विकेट)

बांगलादेश – 20 ओव्हर 6 विकेट 144 रन्स   (मुशफिकूर रहमानने 46, महमुदुल्ला 45, राशिद खान 1 विकेट, मुजीबूर रहमान 1 विकेट )

(PHOTO INPUT :- FACEBOOK/AFGANCRICKETBOARD)

Loading...

मी माझी राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडत आहे :- प्रणब मुखर्जी

Previous article

फेसबूक प्राइवेसी सेटिंगवर ‘बग’चा हल्ला; 14 मिलियन युजर्सवर परिणाम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ