मुख्य बातम्या

दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

0

सुशांतसिंह राजपूतची मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता यांनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. आता यावरून नवीन वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.
दिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचं सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होते. त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बघतात.त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे बघणं महत्त्वाचं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की, सरकारला माहिती आहे की यात आदित्य ठाकरे फसलेले आहेत आणि त्यांना सरकारमधील काही मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.मी माझ्या मुलाखतीत पन्नास वेळा सांगितले आहे की आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह प्रकरणात हात आहे. ते स्वतः यात अडकले असून त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
आतापर्यंत 50 दिवसांत या लोकांनी पुरावे बदलले असतील किंवा नष्ट केले असतील,अजून त्याची पुर्ण माहिती नाही, चौकशीनंतर सगळं बाहेर येईल. पण मला ज्या लोकांकडून काही गोष्टी कळल्या आहेत, त्यामध्ये आदित्य ठाकरे हे या बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यांमध्ये ते जात होते. दिशा सालियान आणि सुशांतसिंह या दोघांच्या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांना शंभर टक्के पुर्ण माहिती आहे. पण हे सामूहिक पद्धतीने लपवलं जात आहे, दररोज शिवाजी पार्कमध्ये या लोकांच्या बैठका व चर्चा होतात, काय करायचं, कसं आदित्य ठाकरेंना वाचवायचं याबाबत तेथे चर्चा केली जाते. असाही आरोप राणे यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा InShorts Marathi.

कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले

Previous article

विदर्भ व मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.