मुख्य बातम्या

मुंबईतील जमावबंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे म्हणतात, ‘हा आदेश मुंबईला नवा नाही’

0

‘मुंबईत कलम १४४ लागू करण्याचा पोलिसांचा आदेश नवा नाही. जमावबंदीचा ३१ ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय पुढे तसाच लागू राहणार आहे एवढाच याचा अर्थ आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये,’ असं आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं प्रशासनानं पुन्हा एकदा संसर्ग रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

NO need to PANIC
The order issued under section 144 CrPC is only an extension of the previous order issued on 31st August. No new restrictions have been imposed by @MumbaiPolice .
Please share and don’t panic. #Section144 #Mumbai
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 17, 2020

त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन केलं आहे. ‘घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. मुंबई पोलिसांनी केवळ ३१ ऑगस्टच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. मुंबईकरांवर कुठलेही नवे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. सर्वांनी आपल्या संपर्कातील लोकांना या वस्तुस्थितीच माहिती द्यावी,’ असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…. ; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचले
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत
रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबईतील जमावबंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरे म्हणतात, ‘हा आदेश मुंबईला नवा नाही’ InShorts Marathi.

अजित दादांच्या कामाचा दणका ; पुण्यातील मेट्रोच्या कामाची पहाटे केली पाहणी

Previous article

बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.