मुख्य बातम्या

आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी गूड न्यूज

0

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एक गूड न्यूज दिली आहे. राजधानी मुंबईतील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. सोमवारी मुंबईमध्ये केवळ 700 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती त्यांनी दिलीये.
राम मंदिराचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करा ; मुख्यमंत्र्यांचा सल्ला
मुंबईत दिवसागणिक कोरोना बाधितांचा आकडा वाढत जाताना दिसतोय. मात्र सोमवारी मुंबई महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या 700 पर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्या होऊनही तुलनेने नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या कमी होती.
महाविकास आघाडी म्हणजे अमर,अकबर,अँथनीचे सरकार – रावसाहेब दानवे
आदित्य ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, “आज मुंबईत दिवसभरातील सर्वाधिक म्हणजे 8776 इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यात फक्त 700 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. अगदी पूर्ण क्षमतेने ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबवली जात असून तीन महिन्यांनंतर खूप मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र, यापुढेही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आरोग्य सुरक्षेत कोणतीही कुचराई करू नका, चेहऱ्यावरचा मास्क उतरवू नका, आपल्याला फक्त आकडे कमी करायचे आहेत.”

Mumbai will see more testing with chase the virus initiative of the @mybmc . It is also the only city to have liberalised testing and allowed citizens to “test at will”. (2/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 28, 2020

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी गूड न्यूज InShorts Marathi.

राफेल गेमचेंजर ठरणार नाही आणि चीनची चिंताही वाढणार नाही – शरद पवार

Previous article

सुशांत सिंह राजपूतच्या ज्या रिपोर्टची सर्वजण वाट पाहत होते अखेर तो रिपोर्ट आला, ही महत्वपूर्ण माहिती झाली उघड !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.