Royal Entertainmentमुख्य बातम्या

एका पेक्षा जास्त लग्न करूनही आज एकाकी जीवन जगतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…

0

90 च्या दशकातील काही अशा अभिनेत्री आहेत की ज्या आजही खूप प्रसिद्ध आहेत. तसेच हेही खरं आहे की यातील काही अभिनेत्रींनी बड्या कलाकारां सोबत देखील काम केलेले आहे. जरी चित्रपटांमध्ये नायिका म्हणून त्यांनी काम केले नसले तरी त्या आजही सगळ्यांच्या लक्षात आहेत. आज आम्ही आपल्याला त्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव घटस्फोटित अभिनेत्रींच्या यादीत येते. होय, त्या अभिनेत्रीचे नाव दीपशिखा आहे.
खरंतर छोट्या पडद्यापासून आपल्या करियरची सुरुवात करणार्‍या दीपशिखाने बरेच नाव कमावले पण ते मिळविण्यासाठी तिने आयुष्यात खूप संघर्षही केला. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील अनेक हिट शोमध्ये तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
ती टेलिव्हिजनच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘बिगबॉस’ या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. पण ती जास्त दिवस बिगबॉसच्या घरात राहू शकली नाही आणि लवकरच ती त्या घरातून बाहेर पडली. दीपशिखाने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली, ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.
दीपशिखा यांच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, दीपशिखाने दोन विवाह केले आहेत, तरीही ती सध्या एकाकी आयुष्य जगत आहे. 1997 मध्ये तिने अभिनेता जीत उपेंद्रशी लग्न केले होते. 10 वर्षापर्यंत त्यांचे हे नाते टिकले पण त्यांनी पुढे 2007 मध्ये घ ट स्फो ट घेतला, घ ट स्फो टानंतर तिने 2012 मध्ये केशव अरोराशी दुसरे लग्न केले.
हे लग्न देखील फक्त 4 वर्षे टिकले त्यानंतर ती पुन्हा अविवाहित झाली. रिपोर्ट्सनुसार 2016 साली केशव आणि दीपशिखा यांच्यात मोठा वा द झाला होता. दीपशिखा यांनीही केशवविरोधात एफ आय आर दाखल केली होती. नंतर या दोघांनी स्वत: ला आणखी एक संधी देऊन एकत्र येण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.
दोन विवाह अयशस्वी झाल्यावरही ती सध्या आनंदी राहते आणि एकाकी आयुष्य जगते. दीपशिखाचे पहिले लग्न उपेंद्रशी झाले होते. त्यापासून तिला दोन मुले आहेत. नंतर तिचे लग्न केशव अरोराशी झाले होते.
दीपशिखा दररोज सोशल मीडियावर आपली छायाचित्रे शेअर करत असते. तुमच्या माहिती साठी सांगतो कि दीपशिखा नागपाल यांचा जन्म 27 जानेवारी 1977 रोजी झाला होता. सध्या त्या 42 वर्षांच्या आहेत, त्यांची सुरुवातीची कारकीर्द खूप रंजक होती.
अशाच माहितीसाठी आमचे पेज नक्की लाईक करा.

The post एका पेक्षा जास्त लग्न करूनही आज एकाकी जीवन जगतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री… appeared first on Home.

‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितने कधीच केले नाही अनिल कपूरसोबत काम, दोघांचाही हा सिनेमा ठरला शेवटचा

Previous article

ड्र ग्स प्रकरणात रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ मराठी अभिनेत्रीचा पती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.