Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘सुपरस्टार’ होण्याआधी हे काम करत होते स्टार… घ्या जाणून

0

मनोरंजनसृष्टीमध्ये सुरू असलेला घ रा णे शाहीचा वा द नवीन नाही. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही इथे पाऊल टाकलेले आणि बडे स्टार बनलेले अनेक जण आहेत. मग अगदी हॉलिवूड असो, बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य सिनेसृष्टी असो…अगदी शून्यातून सुरुवात करुन या सेलिब्रिटींनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. यापैकी अनेक जण तर सुरुवातीला काय काम करायचे हे समजल्यावर तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही.
सध्या एका मागोमाग एक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपटांची रांग लावणारा बॉलिवूडचा सुपरखिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांमध्ये काम करण्याआधी हाँगकाँगमध्ये एका हॉटेलमध्ये शेफ आणि वेटरचं काम करायचा.
रणवीर सिंह- बॉलिवूडचा भन्नाट फॅशनेबल आणि ट्रेंडसेटर म्हणून ख्याती असलेला अभिनेता रणवीर सिंग एका जाहिरात कंपनीसाठी कॉपी रायटर म्हणून काम करायचा. अनेकांना माहीत नसेल, की रणवीर हा उत्तम लेखकदेखील आहे.
अमिताभ बच्चन- गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत ज्यांच्या नावाचा आणि आवाजाचा दबदबा आहे त्या महानायक अमिताभ बच्चन यांना ऑल इंडिया रेडिओनं नोकरी नाकारली होती. आवाज चांगला नसल्याचं कारण देत तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिला होता.
अर्शद वारसी- मोजक्या भूमिका आणि उत्तम अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःच असं खास स्थान निर्माण केलेला अभिनेता अर्शद वारसी चित्रपट क्षेत्रामध्ये येण्याआधी सेल्समन होता. दारोदारी जाऊन तो सौंदर्यसाधनं म्हणजेच पावडर, तेल आणि मेकअपचं साहित्य वगैरे विकायचा.
बम्मन इराणी- वयाच्या चाळीशीनंतर मनोरंजन क्षेत्रात उडी घेतलेले अभिनेते बम्मन इराणी पूर्वी वेटरचं काम करायचे. सिनेसृष्टीमध्ये येण्याआधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये ते वेटर होते.
ब्रॅड पीट- हॉलिवूड स्टार ब्रॅड पीटनं चित्रपटांमध्ये काम करण्याआधी एका हॉटेलमध्ये काम केलं होतं. मॉलमध्ये मोठे बाहुले बनून उभे असलेले लोक असतात, त्याप्रमाणे पपेट बनून तो ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करायचा.
रणदीप हुडा- नेहमी प्रवाहाच्या विरोधात दिसणारं आणि वेगळ्या भूमिकांसाठी ओळखलं जाणारं नाव म्हणजे रणदीप हुडा. बॉलिवूडमध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील देखील रणदीपनं आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. रणदीप आधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा.
नवाजुद्दीन सिद्दिकी- वेब सीरिजची दुनिया असो किंवा सिनेमाचा पडदा; सध्या नवाजुद्दीन सिद्दिकी हे नाव सगळीकडे झळकताना दिसतंय. संयमी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा नवाजुद्दीन सिद्दिकी दिल्लीमध्ये चक्क वॉचमन म्हणून काम करायचा.
आर माधवन- आर माधवन मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी व्याख्यानं द्यायचा. संवादकौशल्य आणि सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं याविषयी तो नवोदित तरुणांना लेक्चर्स द्यायचा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post ‘सुपरस्टार’ होण्याआधी हे काम करत होते स्टार… घ्या जाणून appeared first on Home.

या अभिनेत्रीवर रवी शास्त्री करत होते जीवापाड प्रेम, पण या कारणामुळे नाही होऊ शकले लग्न…

Previous article

अजय देवगणने प्रथमच केला खुलासा, की काजोलची ही एक गोष्ट त्याला अजिबात आवडत नाही…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.