Royal Entertainmentमुख्य बातम्या

वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता…

0

एक काळ असा होता जेव्हा एखाद्या चित्रपटात नायक घ्यायचा असेल तर बरेच गृहितके होते. म्हणजे त्याचा गोरा रंग, चांगले रूप, चांगले व्यक्तिमत्व या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं जात होतं. या सर्व गोष्टी आज या इंडस्ट्रीमध्ये नाहीत किंवा मिटवल्या गेल्या आहेत,  असे नाही. त्या अजूनही काही प्रमाणात चालूच आहेत. पण आज ज्याच्याकडे खरं अस्सल टॅलेंट आहे, त्याला यश मिळतच.
बॉलिवूड मध्ये एक असा राजा अभिनेता होऊन गेला आहे, की ज्याने स्वतःच्या कर्तृत्ववान क्षमतेवर अभिनयाचं राज्य केलं. एक साधा दिसणारा माणूस, दृढ आवाज आणि अभिनयाची आवड यामुळे त्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ओळख निर्माण केली. ” ओम पुरी ” असे या अभिनेत्याचे नाव आहे.
ओम पुरी यांनी अभिनयाची अशी एक व्याख्या तयार केली, की जी सिनेमाच्या जगात एक उदाहरण शिल्लक ठेवून गेली. जे अशक्य वाटले ते त्यांनी शक्य करून दाखवलं. यशाच्या वाटेवर संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. जो ओम पुरी यांच्या वाट्याला सुद्धा आलेला आहे. आज त्या दिवंगत अभिनेत्याचा वाढदिवस. मरणोत्तर 70 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षाची वाट अनुभवुया.
ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी पंजाबच्या अंबाला येथे झाला होता. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप गरीबीत घालवले होते. त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की जेव्हा मी 6 वर्षांचा होता तेव्हा एका ढाब्यावर पोटासाठी भांडी साफ करायचो तिथून जे काही चार पैसे मिळायचे त्यावरच मी घर खर्च भागवायचो.
मला लहानपणापासूनच चित्रपट खूप आवडत होते. आपण अभिनेता होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. पण ते पूर्ण कसं करावं ? याचं उत्तर म्हणजेच एनएसडी. त्यामुळे आधी सुरुवातीचा अभ्यासक्रम संपवला आणि मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. जिथं अभिनय शिकवला जातो.
या अभिनेत्याचा संघर्ष इथेचं संपला नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये त्याला वाटलं की इंग्रजी त्याच्या तोलामोलाच्या लोकांपेक्षा वाईट आहे. याबद्दल तो त्या काळात सतत खूप निराश व्हायचा.
मग त्याने ठरवलं की इंग्रजी शिकायची म्हणजे शिकायचीचं.  या प्रवासात ओम पुरी यांना साथीदार नसीरुद्दीन शहानेही त्याचे खूप मदत केली. याचाच परिणाम म्हणजे, ओम पुरी यांना इंग्रजीवर इतकी चांगली पकड मिळाली की त्यांनी सुमारे २० इंग्रजी चित्रपटांत काम केले. तात्पर्य काय तर अशक्य काहीच नाही. प्रयत्न करत रहा.
मग त्यानंतर जी ओम पुरी यांनी धडाक्यात सुरुवात केली, ती पुन्हा थांबवलीचं नाही. ओम पुरी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना चित्रपटांतच फक्त सहायक भूमिका नव्हत्या तर मुख्य भूमिकाही खूप मिळाल्या.
स्पर्श, आ’क्रो’श, कलयुग, गांधी, जाने भी दो यारों, आरोहन, अर्ध सत्य, मंडी, पार, मिर्च मसाला, सिटी ऑफ जॉय, अ रेल्युकटेंट फंडामेंटलिस्ट, चार्ली विलसन्स वार, इन कस्टडी, गुप्त, चाची 420, चोर मचाए शोर, मकबूल, धूप, मेरे बाप पहले आप, मालामाल वीकली, दबंग, अ डेथ इन अ गुंज, द जंगल बुक और द गाजी अटैक अश्या प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे.
” ओम पुरी ” हे एक महान अभिनेता होते. ज्यांनी त्यांच्या अभिनयातून अजरामर असा ऐतिहासिक इतिहास निर्माण केला आहे. आज दिवंगत अभिनेते ओम पुरी जरी शरीराने सोबत नसले तरी त्यांच्या कलाकृती मधून ते आजही प्रत्येकाच्या मनात आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
The post वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता… appeared first on STAR Marathi News.

बीग बींसोबत ‘त्या’ सीननंतर रात्रभर रडली होती ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री !

Previous article

तारक मेहता फेम माधवी भाभी रियललाईफ दिसायला आहे खूपच सुंदर, मॉर्डन फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.