Royal politicsटॉप पोस्ट

झारखंड:- भाजप युवा मोर्चाकडून स्वामी अग्निवेश यांना मारहाण; आता साधू ही धोक्यात?

0

जमावाकडून मारहाण (मॉब लिंचिंग) झाल्याच्या अनेक घटना सध्या देशात घडत आहेत. सोशल मीडिया वर व्हायरल होणार्‍या मेसेजेस मुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. सोशल मीडिया वर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहे. परंतू असे हल्ले कशात मोडणार जे ठरवून एखाद्यावर केले जातात. आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या साधुना मारहाण केली.

हो, ही घटना खरी आहे. झारखंडमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करण्यार्‍या स्वामी अग्निवेश यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. झारखंड मधील पाकुड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. या संबंधीचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

Loading...

या व्हिडिओ मध्ये दिसते आहे की, स्वामी अग्निवेश हे एक हॉटेल मधून बाहेर पडतात. काही लोक अचानक गोंधळ घालत येतात,  हातात काळे कापड घेऊन घोळक्याने जमा होतात, आणि त्यांना घेराव घालतात. आणि अचानक त्यांना मारहाण करायला सुरुवात करतात. लोक अचानक  झालेल्या हल्याने गोंधळून जातात.

त्यात स्वामी अग्निवेश याचे कपडे देखील फटले आणि त्यांना जखमा देखील झाल्या. स्वामी अग्निवेश हे 195 व्या दामिन महोत्सवात सहभागी    होण्यासाठी गेले.

पण हददा तेव्हा होते, जेव्हा लोक त्या जमवापासून त्यांना सोडावयाचे सोडून मोबाइल मध्ये व्हिडिओ घेण्यासाठी पुढे येतात.  पण कोणीही त्यात मध्ये पडण्याची हिंमत करीत नाही. मारहाण करणारा जमावच तेवढा आक्रमक होता या कारणाने लोकांनी हिंमत केली नसावी, पण लोक मोबाइल मध्ये मात्र व्हिडिओ शूट करीत होते.

स्वामी अग्निवेश यांनी बिफ खाण्याच्या केलेल्या वक्तव्य वरून त्यांना मारहाण करण्यात आली. भाजप कार्यकर्त्याचे असे म्हणणे आहे की स्वामी आदिवासींना भडकवण्याचे काम करीत आहेत.

स्वामी अग्निवेश यांच्या सोबत घडलेली ही काही पहिली घटना नाही. 2011 मध्ये गुजरात येथे एका सभेत एका साधुने स्वामी अग्निवेश यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्यांनी  अमरनाथच्या शिवलिंगबाबत वक्तव्य केले होते.

घटना समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गृहसचिवांना तपासणीचे आदेश दिले आहेत.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/ SWAMI AGNIVESH)

Loading...

हिंदू की मुस्लिम ? राहुल गांधींनी स्पष्ट केले काॅंग्रेस कोणाचा पक्ष

Previous article

पाकिस्तान : निवडणूका संपेपर्यंत नवाज शरीफ यांचे घर ‘तुरूंग’च

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *