Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

आशिष देशमुख यांच्यासमोर ‘या’ दोन पक्षात जाण्याचा पर्याय असेल खुला

0

नागपूर – गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपामध्ये नाराज आहेत. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आज अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

Loading...

देशमुख यांनी जानेवारी महिन्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागात आत्मबळ यात्रा काढली होती. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांचे बालेकिल्ले असलेल्या विदर्भातच भाजपा आमदाराने आत्मबळ यात्रेचा श्रीगणेशा केल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला होता. सप्टेंबर महिन्यात देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत केंद्रातील आणि राज्यातील सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात कमी पडल्याची टीका केली होती.

“सत्ताधारी पक्षातले आमदार राजीनामे देत आहेत. मग जनतेत किती रोष असेल हे दिसून येतं. आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतक-यांवर हल्ला होत आहे. इथे समाधानी कोणीच नाही. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आशिष देशमुखांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत .त्यामुळे देशमुख राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जाण्याचा पर्याय जाधव यांच्यासमोर खुला असण्याची अशी शक्यता आहे.

Loading...

नाराज भाजप आमदार आशिष देशमुखांचा पक्षाला अखेर राम-राम

Previous article

राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही : पंकजा मुंडे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.