Royal politicsटॉप पोस्ट

‘आप’ पंतप्रधान मोदींना लिहिणार 10 लाख पत्र, ‘संपूर्ण राज्याचा दर्जा’ देण्याच्या वचनाची आठवण

0

दिल्ली:-

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सहकार्‍यांनी राज्यपालांच्या कार्यालयात ठिया मांडून उपोषण केले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून दिल्ली ची परिस्थिती कळविली होती. परंतू  ‘आप’कडून आता पंतप्रधान मोदींना 10 लाख पत्र पाठवणार आहेत.

Loading...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवा यासाठी जोरदार प्रचार करण्याचे जाहिर केले आहे. यावेळी ते ‘आप’च्या कार्यकर्त्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावरून संबोधित करीत होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा अशा मागणीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी  तब्बल 10 लाख पत्र पाठवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की जर पंतप्रधान दिलेला वचन पाळू शकले नाहीत तर भारतीय जनता पार्टीला येणार्‍या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून एक ही जागा जिंकू  शकणार नाही. असे सांगत मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी दिल्ली हा संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली.

मागील वेळी अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  लिहिलेले पत्र-  

याबाबत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली च्या प्रशासकीय अवस्थेबद्दल पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी हे मुद्दे मांडले आहे.

  • दिल्ली मध्ये भारतीय प्रशासकीत अधिकारी संपावर गेले आहेत. त्यांचा संप थांबवण्यासाठी नायब राज्यपाल  हे सहकार्य करीत नाहीत. केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
  • आयएएस अधिकारी मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. यामुळे राजधानीच्या प्रशासनाकडे दुर्लक्ष होत आहे.
  • केवळ केंद्र आणि  नायब राज्यपाल हा   संप थांबवू शकतात.
  • दिल्ली शासन आणि दिल्ली चे नागरिक तुम्हाला विनंती करीत आहे की तुम्ही हा संप थांबवावा. म्हणजे आम्हाला पुन्हा आमचे काम करता येईल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री यशवंत सिन्हा  यांनी आप आणि केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आणि केंद्राकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली होती.

तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला की कॉंग्रेस ने देखील स्पष्ट करावे की कॉंग्रेस दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या बाजूने आहे किंवा नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असे देखील म्हणाले की भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांनी आता पर्यंत दिल्ली हा संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत फसवले आहे.

 

Loading...

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार; उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी

Previous article

पहा फोटो – मतांसाठी पाकिस्तानी नेत्याने केले हे कृत्य

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *