Royal Entertainmentमुख्य बातम्या

आमीर खानचा नवीन लुक व्हायरल

0

बॉलीवूड सुपरस्टार आमीर खान सध्या आपल्या आगामी “लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याचे अनेक अवतार पाहण्यास मिळणार आहे. यात त्याने अनेकवेळा आपला लुक बदलला आहे. या चित्रपटातील एक नवीन लुक सोशल मीडियावर लीक झाला आहे. एका व्हायरल व्हिडिओत आमीर खान हा ऑरेंज टीशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसत आहे.
सध्या आमीर खान या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीमध्ये करत आहे. अभिनेत्री करिना कपूर-खान सुद्धा काही दिवसांपूर्वीच शूटिंगसाठी दिल्लीत दाखल झालेली आहे. करिना कपूर-खान प्रेग्नेंट असल्याने आता तिचा बेबी बंप दिसू लागला आहे. तिचे अद्या 100 दिवसांचे शूटिंग बाकी आहे. यामुळे तिचा बेबी बंप दिसू नये यासाठी व्हीएफएक्‍सचा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटांत विजय सेतुपती आणि मोना सिंह देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अतुल कुलकर्णी द्वारा लिखित आणि अद्वैत चंदन हे दिग्दर्शत करणार आहेत. आमीर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट 1994मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.
The post आमीर खानचा नवीन लुक व्हायरल appeared first on Dainik Prabhat.

नवीन गोष्टींची आता सवय झाली

Previous article

सुशांत मृत्यूप्रकरणात अद्याप निष्कर्षापर्यंत पोहचलो नाही; मात्र… – सीबीआयची माहिती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.