Royal Entertainmentमुख्य बातम्या

ऍन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ‘ब्लॅक रॉक’ नावाचा व्हायरस

0

नवी दिल्ली – ऍन्डॉईड मोबाइलमधील डाटा चोरण्याची क्षमता असलेला ‘ब्लॅक रॉक’ नावाचा एक व्हायरस सध्या सक्रिय असून त्याद्वारे ऍन्ड्रॉईड मोबाइल फोन वापर करणाऱ्यांच्या फोनमधून ईमेल क्‍लयंट, ई कॉमर्स ऍप, मेसेजिंग, सोशल मीडिया ऍप, एन्टरटेन्मेंट, बॅंकिंग, वित्तीय ऍपसारख्या 300 ऍपची माहिती चोरली जाऊ शकते, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. 
‘द इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पोन्स टीम’ने या संदर्भातील एक इशारा जुलै महिन्यात आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला होता. तसेच सायबर स्वच्छता केंद्रानेही ऍन्ड्रॉईड मोबाइल फोन वापरणाऱ्यांना त्याबाबतचा सावधगिरीचा इशारा दिला होता, असेही धोत्रे यांनी सांगितले.
धोकादायक ऍपबाबत भारत सरकारने काही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सतर्कतेचे इशारे आणि अशा व्हायरसपासून सावध कसे राहावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 
तसेच संभाव्य धोक्‍यापासून आपल्या मोबाइलमधील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरुकता निर्माण करण्याचे संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात असतात. 
अशा धोकादायक व्हायरसला शोधून काढून हटवण्यासाठी सायबर स्वच्छता केंद्र सक्रिय केले आहे. हे केंद्र इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सहकार्याने आणि उद्योगांच्या मदतीने कार्य करत असते, असे धोत्रे यांनी सांगितले. 
The post ऍन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ‘ब्लॅक रॉक’ नावाचा व्हायरस appeared first on Dainik Prabhat.

100 कंपन्यांचे चिनी नागरिकांकडून हॅकिंग

Previous article

ऍन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ‘ब्लॅक रॉक’ नावाचा व्हायरस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.