मुख्य बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस दिली स्थगिती

0

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती. त्यानंतर मराठा समाजाने काढलेले मुक मोर्चे आणि नंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या विषयावरून पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली होती.
उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने त्याचा मराठा समाजातील उमेदवारांना नोकरी आणि शिक्षणातील प्रवेशांमध्ये आता आरक्षण मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल

पोलिसांच्या विनंतीला वंचितचा प्रतिसाद ; पंढरपूरात मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत

रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील जंबो कोविड सेंटरवर फौजदारी कारवाई करा !

दार उघड उद्धवा दार उघड ; भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस दिली स्थगिती InShorts Marathi.

कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?

Previous article

मेले तरी चालेल पण तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही ! कंगनाचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.