टॉप पोस्टमहाराष्ट्रमुख्य बातम्याशेती

किसानसेनेतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

0

नाशिक येथील चांदवड येथे तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी मोर्चा काढला.

किसानसभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी, पाण्याचा प्रश्न अशा विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Loading...

मोर्च्यात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरूवात झाली व आठवडी बाजार, कृषी उत्पन्न समिती, सोमवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात हा मोर्चा नेण्यात आला. तहसिलदार प्रदीप पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. किसान सभेचे राज्याध्यक्ष किसन गुजर यांनी ही माहिती दिली.

Loading...

कळवण सटाण्यात पाणी प्रश्न पेटणार?

Previous article

आरटीजीएस , एनईएफटीमध्ये शुल्क कपात

Next article

You may also like

Comments

Comments are closed.