Royal Entertainmentमुख्य बातम्या

कंगना राणावत विरोधात दाखल होणार गुन्हा, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप

0

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना राणावत’च्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि तिची बहिणी रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे मजिस्ट्रेट कोर्टाने दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे.

Mumbai: Bandra Magistrate Metropolitan Court orders registration of police complaint against actor Kangana Ranaut (in file photo) and her sister Rangoli Chandel on allegations of a complainant that they tried to create a divide between communities with social media posts. pic.twitter.com/U1p17CEnUs
— ANI (@ANI) October 17, 2020

कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये असं म्हंटलं आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. मोहम्मद इकबाल सैयद असं याचिकाकर्त्याचे नाव आहे.

If Hindus had shown so called peaceful religion intolerance entire Bollywood would’ve been beheaded long ago, they make derogatory films for our religion and then claim they are scared of saffron color, look at the propaganda and it’s absurd and dumb logic. #parisbeheading https://t.co/5552KyPVOd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2020

सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना राणावत विरुद्ध आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास तिची चौकशी देखील केली जाईल. कंगना सातत्याने बॉलिवूडला आणि मुंबईला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे.
The post कंगना राणावत विरोधात दाखल होणार गुन्हा, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप appeared first on Dainik Prabhat.

Comment on घरात या ठिकाणी ठेवा तुरटी. घरात कायम धन व सुखशांती टिकून राहील..! by Unknown

Previous article

रणदीप-इलियानाची जोडी झळकणार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.