मुख्य बातम्या

80 वर्षाच्या योध्याने 80 तासात सरकार पाडलं !

0

टीम महाराष्ट्र देशा : सरकार स्थापन करण्यासाठी आमदारांची पुरेशी संख्या नसल्याने भाजप विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात आता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार येणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट टाकत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील फडणवीस यांचं जुलमी सरकार उलथवून दाखवलं. मोहीम फत्ते…! आता एक घोषणा होऊन जाऊ द्या… महाराष्ट्राचा बुलंद आवाज…, असा आशय लिहिला आहे.

Loading...

राज्यात गेले काही दिवस सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी होते. निवडणुकीच्या आधीच शरद पवारांनी हे भाजप सरकार उलथवून लावणार असल्याचा निर्धार केला होता. त्या दृष्टीने शरद पवारांनी राज्यात मोर्चेबांधणीला सुरवात केली होती. नव उमेदवारांना संधी देत आणि तरुण कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत शरद पवारांनी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा उभे केले. सातारच्या पडत्या पावसात सभा घेत शरद पवारांनी आपल्यातला नेता अजूनही तरुण आहे, असे दाखवून दिले. शरद पवारांनी निवडणुकीच्या काळात घेतलेली मेहनत ही निवडणुकीच्या निकालात दिसून आली. आब की बार 200 पार म्हणणाऱ्या भाजपला धक्का देत कॉंग्रेस आघाडीने ९८ जागा मिळवत महायुतीला चांगलीचं लढत दिली. निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेल्या सत्ता संघर्षातही शरद पवारांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे उद्या येऊ पाहणाऱ्या महाविकासआघाडीच्या सरकारचे खरे शिल्पकार हे शरद पवारचं आहेत, असे सांगण्यात येत आहे.

Loading...

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट, 162 आमदार सोबत असल्याचा पुरावाच केला सादर !

Previous article

अचानक विधानभवनातून “या” कारणामुळे सुप्रिया सुळे पळत बाहेर गेल्या !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.