टॉप पोस्ट

नोटबंदीनंतर नोंदणी रद्द केलेल्या 73000 कंपन्यांनी जमा केले 24000 कोटी रूपये

0

नवी दिल्ली :-

सरकारी आकडेवारीनुसार नोटबंदी नंतर 73000 नोंदणी रद्द केलेल्या कंपन्यांनी 24000 कोटी रूपये बॅंकेत जमा केल्याचे आढळून आले आहे.

Loading...

काळा पैसा व बेकायदेशीर संपत्तीवर रोख आणण्यासाठी सरकारने ज्या कंपन्या गेल्या अनेक दिवसांपासून कार्य करत नाहीत अशा 2.26 लाख कंपन्यांची नोंदणी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सने रद्द केली होती. या रद्द केलेल्या अनेक कंपन्याकडे बेकायदेशीर संपत्ती असल्याचे आढळून आले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, नोंदणी रद्द केलेल्या 2.26 लाख कंपन्यांपैकी 1.68 लाख कंपन्यांनी नोटबंदीनंतर बॅंकेत पैसे जमा केल्याचे आढळून आले आहे. या पैकी 73000 कंपन्यांनी 24000 कोटी रूपये बॅंकेत नोटबंदीनंतर जमा केले आहेत.

या सर्व कंपन्याची विविध बॅंकेअतंर्गत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. ही कागदपत्रे म्हणजे मंत्रालयाचे चार वर्षातील यशच म्हणावे लागेल.

तसेच 68 कंपन्यांची चौकशी सुरू आहे. त्यापैकी 19 कंपन्यांची चौकशी सिरियस फ्राॅड इन्वेस्टिगेशन ऑफिस आणि 49 कंपन्यांची चौकशी रजिस्टार आॅफ कंपनीस् यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

तसेच कंपनी कायद्या अंतर्गत सरकारकडे कोणत्याही कंपनीची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार आहेत.

सरकारने काळा पैसा व बेकायदेशीर संपत्तीवर रोक आणण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 100 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली होती.

Loading...

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण 

Previous article

शेतकर्‍यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक, होईल का मागण्याची पूर्तता पूर्ण?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *