टॉप पोस्ट

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण 

0

बालासोर (ओडिसा) :- 

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे आज भारताने  परीक्षण यशस्वी केले. मुख्य म्हणजे ही पुर्णपणे भारतीय बनावटीची मिसाइल आहे व या मिसाइलची मारक क्षमता 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. इतर मिसाइलच्या तुलनेत अग्नि -5 टेक्नाॅलाॅजीच्या बाबतीत परिपुर्ण असणार आहे व या मिसाइलमध्ये  नेव्हिगेशन, मार्गदर्शन तंत्र तसेच आधुनिक इंजिन असणार आहे.

Loading...

ओडिसातील बालासोर येथील डॉ. अब्दुल कलाम केंद्रावरून रविवारी सकाळी 9.48 वाजता अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले. अग्नि -5 ची ही सहावी चाचणी होती व प्रत्येक चाचणीच्या वेळेस त्यामधील अंतरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (DRDO) अधिकारी म्हणाले की, अग्नि -5 ने चाचणीमध्ये संपुर्ण अंतर पार केले आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

अग्नि -5 च्या या आधी केलेल्या चाचण्या – 

सर्वात प्रथम अग्नि -5 ची चाचणी 2012 व त्यानंतर 2013 मध्ये करण्यात आली होती. तसेच तिसरी, चौथी व पाचवी चाचणी मोबाईल लाॅचरवर करण्यात आली होती.

अग्नि -5 ची पहिली चाचणी -19 एप्रिल 2012, दुसरी चाचणी 15 सप्टेंबर 2012, तिसरी चाचणी 31 जानेवारी 2015, चौथी चाचणी 26 डिसेबंर 2016 व पाचवी चाचणी 18 जानेवारी 2018 ला करण्यात आली होती.

भारताकडे असलेली अग्नि सिरीज –

अग्नि – 1 ची मारक क्षमता 700 किमी, अग्नि – 2 ची मारक क्षमता 2000 किमी, अग्नि – 3 व अग्नि – 4 ची मारक क्षमता 2500 किमी पेक्षा अधिक आहे.

(PHOTO INPUT : – TWITTER/DRDO)

Loading...

Women’s Asia Cup: मलेशिया 27 धावांवर आॅलआउट, भारताचा 142 धावांनी शानदार विजय

Previous article

नोटबंदीनंतर नोंदणी रद्द केलेल्या 73000 कंपन्यांनी जमा केले 24000 कोटी रूपये

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *