Royal politicsटॉप पोस्ट

1992 ते 2018 मध्ये भारतात 47 पत्रकारांची हत्या, तर जम्मू -काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या

0

जम्मू-काश्मीर येथून निघणाऱ्या ‘रायझिंग काश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची गुरूवार दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यासाठी एका  हल्लेखोराला जम्मू काश्मीरच्या पोलिंसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

शुजात बुखारी यांच्यावरील हल्ल्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जम्मू-काश्मीर सारख्या भागात पत्रकारीता करणे किती अवघड आहे हे यातून पुन्हा एकदा समोर आले. गेल्या दशकभरात जम्मू-काश्मीर अनेक पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकारांना त्यांच्या कामासाठी मारहाण करण्यात आली आहे, त्यांचा छळ करण्यात आला आहे.

Loading...

मागील वर्षी बेंगलोर येथे गौरी लकेंश पत्रिका यांच्या संपादिका गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस देखील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण परिस्थितीमध्ये काहीही बदल होताना दिसून येत नाही.

(Source of Data – Committee to Protect Journalists)

फक्त जम्मू काश्मीरमध्येच नाहीतर संपुर्ण भारतामध्ये ही परिस्थिती दिसून येते. मिडियावर निर्बंध आणणे, पत्रकाराना त्रास देणे, त्यांचा छळ करणे यासारख्या गोष्टी वारंवार होताना दिसून येतात.

1992 ते 2018 मध्ये भारतामध्ये 47 पत्रकारांची हत्या करण्यात आली. तसेच 2018 मध्ये तीन पत्रकारांची हत्या करण्यात आली. कमिटी आॅफ प्रोटेक्ट जर्नलिस्ट (CPJ) यासंस्थेतून ही माहिती मिळाली .

तसेच 1990 ते 2018 दरम्यान जम्मू – काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये शुजात बुखारी यांचा देखील समावेश आहे.

 

 

1990 ते 2018 दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये हत्या करण्यात आलेले पत्रकार –

19 फेब्रुवारी 1990 – लासा कौल  (दुरद्रर्शन डायरेक्टर)

1 मार्च 1990 – पीएन हंडू (असिटंट डायरेक्टर आॅफ इनफाॅरमेशन)

23 एप्रिल 1991 – मोहम्मद शबान वकील (अल-सफा वृत्तपत्राचे मुख्यसंपादक)

29 सप्टेंबर 1992 – अली मोहम्मद महाजन (हमदर्द व अफताब वृत्तपत्र)

16 आॅक्टोंबर 1992 –  सय्यद गुलाम नाबी (जाईंट डायरेक्टर इनफाॅरमेशन)

3 आॅक्टोंबर 1993 –  मोहम्मद शफी भट (रेडिओ काश्मीर)

29 आॅगस्ट 1994 – गुलाम मोहम्मद लोन

10 सप्टेंबर 1995 – मुशताक अली (एएनआय फोटोग्राफर)

10 एप्रिल 1996 -गुलाम रसुल शेख (संपादक रेहनुमा -ए काश्मीर(उर्दु) व सॅफरोन टाईम्स (इंग्रजी) )

1 जानेवारी 1997 – अलताफ अहमद फकतूर (दुरदर्शन अ्ॅखर)

16 मार्च 1997 – सैदान शफी

8 एप्रिल 1997 – तारीक अहमद (टेलिव्हिजन प्रोड्युसर)

10 आॅगस्ट 2000 – प्रदिप भाटिया ( हिंदूस्थान टाईम्स फोटोग्राफर)

2003 – पर्वाज मोहम्मद सुलतान (लोकल न्यूज एजेंसीचे संपादक)

9 मे 2004 – अब्दुल माजीद भट

20 एप्रिल 2004 – असीया जिलानी

11 मे 2008 – अशोक सोडी (डेली इक्सेलसियर फोटोग्राफर)

13 आॅगस्ट 2008– जावेद अहमद मीर

14 जून 2018 – शुजात बुखारी (संपादक रायझिंग काश्मीर)

 

(PHOTO INPUT :- KARNIKA KOHLI/THE WIRE)

 

Loading...

Column : करामती ‘मोदी अॅंड सन्स’

Previous article

अरविंद केजरीवाल यांना प्रादेशिक पक्षांचे देखील समर्थन, लगातार सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *