Royal politicsटॉप पोस्ट

पश्चिम बंगाल:- मोदींच्या सभेत मंडप कोसळून 24 जण जखमी, जाणून घ्या काय आहे घटना

0

पश्चिम बंगालमध्ये मदिनापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये मोठा अपघात घडला आहे. पंतप्रधान मोदी ज्या सभा मंडपात भाषण देत होते त्या मंडपाचा काही हिस्सा पडून त्यात 24 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

मदिनापूर येथे लोकांना संबोधित करताना ज्या मांडवाखाली लोक बसले होते. त्या मांडवचा काही भाग अचानक लोकांच्या अंगावर पडला. घटना घडताच पंतप्रधान मोदींनी तेथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या एसपीजी च्या जवानांना मदत करण्यासाठी पाठवले.

Loading...

तेथे उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांनी संगितले की, भाजपचे अनेक उत्साही कार्यकर्ते मांडवत घुसत होते. पावसामुळे अनेक लोक भिजू नये या हेतूने मांडवत येऊन थांबण्याचा प्रयत्न करीत होते.  त्यांना सावधतेचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतू मोदींचे भाषण सुरू झाले आणि काही वेळाने मांडवाचा काही भाग अचानक खाली कोसळला. यातच लोक जखमी झाले, जखमी लोकांना मदिनापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले.

या घटनेनंतर नरेंद्र मोदी जखमी लोकांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथे जखमी लोकांची विचारपूस केली. यात अनेक महिला देखील जखमी झाल्या होत्या. त्यांना मोदींनी धैर्य दिले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे की, आम्ही मदिनापूर येथील रॅली मध्ये जखमी झालेल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. त्यांचा इलाज करण्यात सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे.

Loading...

Sacred Games:- संवादासाठी कलाकार जबाबदार नाहीत- उच्च न्यायालय; कॉंग्रेसकडून याचिका मागे

Previous article

महिला आरक्षणाबाबत राहुल गांधीचे पंतप्रधानांना पत्र, पावसाळी अधिवेशनात विधेयक पास करण्याची मागणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *