मुख्य बातम्या

‘2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होणार’

0

‘राष्ट्रवादीचा 50 आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं. त्याप्रमाणेच झालं. 2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, असा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले.

ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. याच पार्श्वभूमीवर भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असे दावे महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांकडून केले जात आहे. तसेच यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, अनेक नेते आमच्या संपर्कात आहे.

Loading...

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी आम्हाला फोन करुन संपर्क केला आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं. राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे,’ असे पाटील म्हणाले.

दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं आहे. टीव्ही लावला की जनतेला सकाळी एक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच राजकारण बघायला मिळालं, असे यावेळी पाटील बोलताना म्हणाले.

Loading...

नगरमध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग, आता चालणार पवार-थोरातांचा शब्द

Previous article

अभिनेता मोहनलाल यांचे आहे दुबईतील बुर्ज खलिफा मध्ये घर, राहणीमान महाराजा पेक्षा कमी नाही !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.