मुख्य बातम्या

व. पु. काळे यांचे मजेशीर आणि उपहासात्मक कोट्स; नक्कीच वाचा

0

१) स्टोव्हची जातच लहरी पुरूषाप्रमाणे. शेगड्या बिचाऱ्या गरीब असतात. एव्हर रेडी! स्टोव्हचं तसं नाही. त्याची मिजास सांभाळली तरच पेटणार.

२) पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत

Identity Cards सारखी विनोदी गोष्ट या जगात दुसरी काही नसेल. आपण आहोत कसे हे त्यांना हवं असतं. त्याऐवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते ओळखतातमाणूस निराळा वागतोय तो कामातून गेला असं आपण पटकन बोलतो. पण तसं नसतं या सगळ्याचा अर्थ तो फक्त आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो

५)  राहण्यासाठी अक्षता लागत नाहीत तर अंडरस्टँडिंग लागतं.

६) सुंदर मुलीसाठी झुरायला फार अक्कल लागत नाही.

७) माणसांचे चेहरे कसे असतात? तर भारताने जागतिक बँकेकडून काढलेलेल कर्ज त्यांना त्यांच्या बेसिकमधून फेडायचंय असे

पापणीच्या आत झालेली पुटकुळी फक्त डोळ्यांंना समजते, म्हणून कोणी डोळा फोडतो काय?बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते.  वैयक्तिक टीकास्पद सवयी समजासाठी सोडायच्या असतात. तेव्हा सभ्यतेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्या नसतात.

त्यांचे स्री-पुरुष विषयक जबरदस्त विचार नक्कीच वाचा

रतीसुखाच्या वेळेला बाईला अंधार सोबती वाटतो. पुरूषांना उजेड हवा असतो. बाईने डोळे मिटून घेतले की ती चिन्मयापर्यंत पोहचते. पुरूष मृण्मयात मातीच्या शरीराशी थांबतो. तो चैतन्यापर्यंत पोहचत नाही

2. आमच्या संसाररथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उथळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही

3. माणसाला संसारात काय हवं असतं. मनमिळावू जोडीदार, भागेल एवढी प्राप्ती. पहिला नंबर काढणारी जरी नाही तरी पास होत जाणारी मुलं, छोटसं घर. नव्वद टक्के एवढ्यावर तृप्त असतात

4. नवरा बायकोचं नातं म्हटलं की मायेचा ओलावा आला. थोडंसं का असेना पण दोघांना एकत्र गप्पागोष्टी करण्यासाठी एखादा स्वतंत्र कोपरा लागतोच

5. सर्वात जवळची माणसंच जास्त तऱ्हेवाईकपणे वागतात. त्याचं आपण मुळीच मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करून घेऊ नये याचा घरबसल्या धडा मिळावा हा त्यांचा सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही

6. देखणी  माणसं सगळ्यांनाच मोहत पाडतात. पण एखाद्या देखण्या माणसाबद्दल आपलेपणाची भावना कधी निर्माण होते? तो प्रेमळ असेल तर. लाघवी, नम्र, मनमिळावू असा वैष्णवजन असेल तर. उन्मत्त सौंदर्यावर कोण लुब्ध होईल?

7. पोरगी म्हणजे एक झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही

8. पुरूषांना नक्की काय हवं असतं? फक्त स्त्रीसोख्य? मग असल्या वृत्तीची माणसं लग्न का करतात? मजेत एकट्याने राहावं. इच्छातृप्तीसाठी बाजार काही ओस पडलेला नाही. पण तसं होणार नाही. ह्या पुरूषांना मोलकरीण, स्वयंपाकीण, शय्यासोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी उचलणारी एक परिचारिका हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी पण तिला लौकिक नको. एका बायकोत त्यांना इतकं हवं असतं 

9. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही

10. तुझं व्यक्तीमत्व निर्भिड असावं. रोखठोक पण सरळ, बाणेदार तरीही नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक. अर्थात विलक्षण धैर्य असल्याशिवाय हे रूपांतरण संभवत नाही

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील मुन्नीची आई आहे बॉलिवूड अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयीच्या खास गोष्टी

Previous article

छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.