मुख्य बातम्या

शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे; शिवसेनेचा भाजपला चिमटे काढत दिला ‘हा’ सल्ला

0

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. यावेळी सामनाच्या अग्रलेखात विविध विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.

नेमके काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात :-

प्रत्येक राज्यातील मनुष्यहानी टाळणे हे कर्तव्य आहे व केंद्राने त्या कामी सहकाराचा हात पुढे केला पाहिजे. राज्यकर्त्याने व राजाने मनाची दिलदारी दाखवायला हवी. तरच तो राजा शोभतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! नड्डा म्हणतात, ”स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा!” त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ”ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.” तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत.

मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. श्री. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे!

दहावीचा निकाल जाहीर; वाचा आपल्या विभागाची टक्केवारी आणि यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये
वाटलं की ओवेसी, पण नंतर दिसलं पवार साहेबांचं नाव; ‘या’ भाजप नेत्याची टीका
करोनावर व्हायरल झालेले भन्नाट जोक्स वाचा; पोटभर हसा…
चहा की दारू… ही भन्नाट कविता नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे जबरदस्त विचार नक्कीच वाचा; प्रेरणा मिळेल

राम मंदिर भूमिपूजन त्याच ठिकाणी व्हावं, ही सर्वांची इच्छा आहे

Previous article

सुशांत राजपूत प्रकरणाला नवे वळण, सुशांतच्या वडिलांनी केली रिया वरती पोलीस केस, हे केले आहेत आरोप !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.