Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

‘कोविड १९’चे आहेत ‘इतके’ प्रकार; लंडनच्या किंग्स कॉलेजचे संशोधन काय आहे पहा

0

करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचे संशोधन आणि त्याच्यामधील रुग्णांचे लक्षण लक्षात घेऊन आता अमेरिकन व ब्रिटन संशोधकांनी एक खास माहितीचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कोविड १९ याचे एक नाही, तर सहा प्रकार आहेत. याची आणखी माहिती घेऊन यावरील उपचाराची पद्धत ठरवण्यास मदत होणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

ब्रिटन व अमेरिकेतील १६०० रुग्णांचे मार्च-एप्रिल महिन्यातील लक्षणे आणि त्यांना रुग्णालयात केलेल्या उपचाराच्या पद्धतीचा एकत्रित अभ्यास करून हा अहवाल तयार केला जात आहे. Covid Symptom App ची मदत घेऊन लंडनच्या किंग्स कॉलेज यांनी हे अनुमान काढण्याची तयारी केली आहे. त्यानुसार करोनाचे एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षण दिसलेल्या रुग्णांचा व उपचाराचा एकत्रित अभ्यास केला जात आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर फ़क़्त लक्षणांवरून संबंधित रुग्णाला हॉस्पिटलात दाखल करण्याची गरज आहे किंवा नाही हे समजणार आहे.

नियमित खोकला, ताप, वास न घेता येणे, डोकेदुखी, जुलाब, थकवा येणे, श्वास घेण्यास अडचण, पोटदुखी यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त लक्षणे कोविड १९ झालेल्या रुग्णांना दिसतात. त्यांचा व्यवस्थित रेकोर्ड ठेऊन उपचाराची पद्धत्ती निश्चित करण्यासाठी हे संशोधन खूप महत्वाचे ठरणार आहे.

गेहलोतांची गोळाबेरीज पक्की; पायलटांना झटका, पहा राजस्थानचे राजकीय रंग
‘कोविड १९’चे आहेत ‘इतके’ प्रकार; लंडनच्या किंग्स कॉलेजचे संशोधन काय आहे पहा
सुवर्णसंधी : पोलीस दलात होणार ‘एवढ्या’ जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांची घोषणा
नाश्त्याला पोहे खा आणि ‘हे’ आरोग्यदायी फायदे मिळवा
नगरच्या ‘या’ मंत्र्यांच्या पत्नीला झाली करोनाची लागण; मंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

लाॅकडाऊन संदर्भात छगन भुजबळांनी मंडळ मत

Previous article

गेहलोतांची गोळाबेरीज पक्की; पायलटांना झटका, पहा राजस्थानचे राजकीय रंग

Next article

You may also like

Comments

Comments are closed.