Royal politicsटॉप पोस्ट

156 वर्ष जुन्या या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता या नावाने ओळखले जाणार

0

सध्या शहरांचे, जागेचे नाव बदलण्याचा ट्रेंड जोरात आहे. प्रत्येक येणारे सरकार त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या आवडीच्या विचारसरणीच्या लोकांचे नाव देत असतात. आता या नाव बदलण्याच्या यादीत आणखी एका जागेची नोंद झाली आहे. प्रसिध्द मुगलसराय जंक्शनचे नाव बदलण्यात आले आहे.

नाव बदलून रेल्वे वेळेवर येईल का ते माहित नाही, मात्र नाव बदलण्यात आले आहे.

Loading...

उत्तरप्रदेश येथील 156 वर्ष जुन्या मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव काल बदलण्यात आले. आता या स्टेशनचे अधिकृत नाव हे पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आणि भारतीय जनसंघाचे सह-संस्थापक पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे नाव या स्टेशनला देण्यात आले आहे. काल झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते.

रेल्वेने देखील त्यांच्या वेबसाईट वरील मुगलसराय हे नाव बदलले आहे. रेल्वेची वेबसाईट, एनटीईएस आणि आईआरसीटीसीच्या वेबसाईटवर देखील आता मुगलसराय स्टेशनचा कोड ‘डीडीयू’ असणार आहे.

फक्त मुगलसराय जंक्शनच्या मुख्य भवनातूनच नाही तर, रेल्वेची टिकिटे, वेबसाईट इ. वरून देखील मुगलसराय हे नाव इतिहास जमा झाले अाहे. आता त्या जागी पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन हे नाव असणार आहे.

मुगलसराय – एेतिहासिक महत्त्व

हे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात जुन्या रेल्वे स्टेशन पैकी एक आहे. 1862 मध्ये इस्ट इंडिया कंपनीने याची उभारणी केली होती. मुगलसरायला ‘द गेट वे टू इस्ट इंडिया’ या नावाने देखील ओळखले जाते.

156 वर्ष जुने हे स्टेशन 16 व्या शतकात शेर शाह पुरी यांच्याकडून बांधण्यात आलेल्या ग्रॅंड ट्रंक रोडला लागून आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात गजबजलेल्या स्टेशन पैकी एक असून, या स्टेशन वरून रोज 125 ट्रेन जात असतात.

(आधीचे नाव)

मुगलसराय हे भारताते दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्मस्थान देखील आहे.

पंडित दिनदयाल उपाध्याय –

फेब्रूवारी 1968 ला मुगलसराय जंक्शन जवळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारसरणीचे तसेच भारतीय जन संघचे सह-संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

मागील चार वर्षापासून या स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अखेर काल अधिकृतरित्या भाजप सरकार कडून या स्टेशनचे नाव बदलण्यात आले.

केंद्र सरकारने परवानगी दिली अाहे, मात्र विरोधी पक्षांनी इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

(Pt. Deendayal Upadhyay)

भगवेकरण –

संपूर्ण स्टेशनला तसेच नावाच्या ठिकाणी भगवा रंग देण्यात आला आहे.

विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज-

नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला.

Loading...

‘नोव्हेंबरच्या अखेर मराठा आरक्षण मिळेल, तो पर्यंत महाभरती स्थगित’- मुख्यमंत्री

Previous article

Loveratri Trailer :- 9 दिवस 9 रात्रीची लवस्टोरी ठरेल का बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *