Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

झंप्या आणि चिंगी पोहोचले अमेरिकेत; वाचा त्यांच्यासोबत घडलेले भन्नाट किस्से

0

अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!तर त्याचे झाले काय…आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते… आणि तिला हे दुकान दिसते… अरे वा!! “आमच्या इथे नवरा विकत मिळेल” अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली…पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती… “इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे.”चिंगी खुश झाली.!!पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: “येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!” चिंगी जाम खुश झाली. “च्यामारी लैइ भारी” असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : “इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!”आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : “इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात.”“अहाहा कित्ती मस्त.!!” पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!पाचव्या माळ्यावर गेली…. पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…“या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! “=================आणखी वाचा…आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते “आमच्या येथे बायको विकत मिळेल”!!सेम टू सेम बिल्डींग… ५ माळ्यांची… आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : “येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!”चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून पुण्याला घेऊन येतो!!=================जाता जाता…आत्ताच आलेल्या अहवालानुसार… बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!!

झंप्या आणि चिंगी पोहोचले अमेरिकेत; वाचा त्यांच्यासोबत घडलेले भन्नाट किस्से
धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी
धक्कादायक : काल राज्यात ‘एवढे’ मृत्यू; करोनाचे संकट गडद झालंय
उद्धव ठाकरेंनी दाखवली ‘पॉवर’, ‘या’ मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय केले रद्द
हॉटेल सुरु करण्याबाबत राज्य सरकारने केले ‘हे’ महत्वाचे भाष्य

Loading...

धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी

Previous article

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करून पहा, तिजोरी पैशांनी भरलेली असेल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.