Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमहाराष्ट्रमुख्य बातम्या

धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी

0

औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारे करोनाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जालना जिल्ह्यातील १७ वर्षांच्या करोनाबाधित मुलीसह औरंगाबाद जिल्ह्यातील ११ करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३१० झाला आहे. तसेच रविवारी (पाच जुलै) दिवसभरात २१७ कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातीत एकूण करोनाबाधितांची संख्या ६७३० झाली आहे.

Loading...

लॉकडाऊन शिथिल करण्यापूर्वी औरंगाबादमध्ये रुग्ण वाढतच होते. पण जसे वातावरण शिथिल होऊ लागले तसे रुग्णांचे प्रमाण वाढले. रोज सरासरी ९० ते १२० यादरम्यान नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच औरंगाबादमध्ये मृत्युसंख्याही वाढत आहे. 

काल राज्यात १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८ हजार ८२२ इतकी झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणारे मृत्यू अधिक आहेत. राज्यात ६५५५ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येनं दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.

झंप्या आणि चिंगी पोहोचले अमेरिकेत; वाचा त्यांच्यासोबत घडलेले भन्नाट किस्से
धक्कादायक : औरंगाबादेत गेल्या २४ तासांमध्ये गेले ‘एवढे’ करोनाबळी
धक्कादायक : काल राज्यात ‘एवढे’ मृत्यू; करोनाचे संकट गडद झालंय
उद्धव ठाकरेंनी दाखवली ‘पॉवर’, ‘या’ मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय केले रद्द
हॉटेल सुरु करण्याबाबत राज्य सरकारने केले ‘हे’ महत्वाचे भाष्य

Loading...

धक्कादायक : काल राज्यात ‘एवढे’ मृत्यू; करोनाचे संकट गडद झालंय

Previous article

झंप्या आणि चिंगी पोहोचले अमेरिकेत; वाचा त्यांच्यासोबत घडलेले भन्नाट किस्से

Next article

You may also like

Comments

Comments are closed.