टॉप पोस्ट

क्रस्ना डायग्नोस्टीक्स संस्थेतर्फे सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये १३० झाडांचे मोफत वृक्षा रोपण

0
(By Namrata Kamat)

72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट या कॅम्पसमध्ये (सुदुंबरे, तळेगाव-चाकण) “क्रस्ना डायग्नोस्टीक्स या संस्थेकडून १४ ऑगस्ट रोजी मोफत वृक्षारोपण करण्यात आले. सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक जी. एम. देशमुख, डी. के. देसाई, पी.आर.ओ. विमला मिश्रा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. क्रस्ना डायग्नोस्टीक्स संस्थेचे जी. एम. श्री. नीरज बाजपेयी, आदर्श कर्नावड, सामाज कल्याण अधिकारी देवेंद्र केळोदे, मीडिया ब्रॅण्डिंगचे मोतीलाल वाघ तसेच सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे विद्यार्थी व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष रोपणाचा कार्यक्रम पार पडला.

क्रस्ना डायग्नोस्टीक्स ही संस्था महानगरपालिकेअंतर्गत संपूर्ण भारतात सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर आरोग्य विभागांतर्गत रेडिओलॉजी णि पॅथॉलॉजी या सेवा पुरवण्याचं काम करते. भारत सरकारच्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात अत्यंत अल्पदरामध्ये सर्वसामान्य लोकांना, दारिद्र्य रेषेखालील लोकांना आणि जेष्ठ नागरिकांना मोफत सेवेचा लाभ ही संस्था १४ राज्यात पुरवते.

तसेच जनजागृतीसाठी नवनवीन योजना आणि उपक्रम ह्या संस्थेकडून राबवल्या जातात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच निसर्गाचीही काळजी घेणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. निसर्गाचे आपण देणे लागतो याचे भान ठेऊनच या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते.
Loading...

Atal Bihari Vajpeyee : राज्यशास्त्राचा विद्यार्थी जेव्हा भारताचा पंतप्रधान होतो

Previous article

अमित शाह करत असलेल्या ध्वजारोहणावेळी खाली आलेल्या तिरंग्याचे ‘ते’ ट्विट दुरदर्शनने केले डिलीट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *