Royal politicsटॉप पोस्ट

समलैंगिकता हिंदूत्वाच्या विरोधात, यावर उपचार केला पाहिजे – सुब्रमण्यम स्वामी

0

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. यावेळेस सुब्रमण्यम स्वामी समलैंगिकतेविषयी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, समलैंगिकता ही हिंदूत्वाच्या विरोधात आहे. आणि यांचा उपचार झाला पाहिजे.

Loading...

न्यूज एजेंसी एएनआईशी बोलताना ते म्हणाले की, ही साधी गोष्ट नाही. आपण हे साजरे करायला नाही पाहिजे. हे हिंदूत्वाच्या विरोधात असून आपण यावर मेडिकल रिसर्च करण्याची गरज आहे आणि पाहिले पाहिजे की, यावर उपचार होतो की नाही.

आज पासून सर्वाच्च न्यायालयात समलैंगिकता भारतात गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 वर सुनवाई सुरू झाली आहे.

याआधी देखील त्यांनी या विषयावर वादग्रस्त विधाने केली आहेत. या वर्षीच्या जानेवारीमध्ये ते म्हणाले होते की, समलैंगिकता भारतात गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 तसेच ठेवायला हवे, जेणे करून समलैंगिकतेचे घमंड दाखवणाऱ्यांना शिक्षा मिळेल. तसेच 2015 साली ते म्हणाले होते की, समलैंगिकता हा ‘अनुवंशिक दोष’ आहे.

समलैंगिकतेवर आजपासून सर्वोच्च न्यायालयाच सुनावणी सुरू – 

सोमवार पासून कलम 377 वर सर्वाच्च न्यायालयाने या महत्त्वाच्या मुद्दावर सुनावणी सुरू केली. तसेच केंद्र सरकारने याचिकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यावर सर्वाच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले.

आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरीमन, न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड व इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

 

Loading...

अस्तित्वातच नसलेल्या जिओच्या शिक्षण संस्थेचा दर्जा ‘श्रेष्ठ’, केंद्र सरकारचा जादुई निर्णय

Previous article

या देशांमध्ये समलैंगिकतेला आहे मान्यता

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *