Royal Entertainmentमुख्य बातम्या

थायलंडमध्ये 10 लाख फेसबुक अकाऊंट ब्लॉक

0

सरकारविरोधात आंदोलक रस्त्यावर – फेसबुकने दिला कायदेशीर लढाईचा इशारा

बॅंकॉक – थायलंडमधील सरकारने 10 लाख नागरिकांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले आहेत. या गटाने थायलंडच्या राजावर टीका केल्याने सरकारने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकारच्या या कारवाईविरोधात फेसबुक आता थेट कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. 
यापूर्वी सरकारने रॉयलिस्ट मार्केट ग्रुप नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गटाला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही या गटाने थायलंडमधील राजासंदर्भातील मजकूर सोशल नेटवर्किंगवरुन हटवण्यास नकार दिला होता.

थायलंड सरकाने अखेर या गटाशी संबंधित 10 लाख लोकांचे फेसबुक अकाऊंट बॅन केले. या कारवाईनंतर रॉयटर्सशी बोलताना फेसबुकच्या प्रवक्‍त्यांनी थायलंड सरकारच्या निर्णयावर टीका केली. सरकारने अशाप्रकारे लोकांवर बंदी घालणे अयोग्य आहे. हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. 
सरकारने लोकांना दिलेला इशारा हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांमध्ये प्रवक्त्‌यांनी फेसबुकची बाजू मांडली.
The post थायलंडमध्ये 10 लाख फेसबुक अकाऊंट ब्लॉक appeared first on Dainik Prabhat.

अलिबाबाशी संबंधित ई कॉमर्स कंपनी धोकादायक

Previous article

फोटोग्राफीत तुम्हांला आवड असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.