महाराष्ट्रमुख्य बातम्या

२० फेब्रुवारी रोजी नांदेड येथे महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा – खा. अशोक चव्हाण

0

मुंबई, १८ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा २० फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आयोजित केली आहे. या सभेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

नांदेड येथील स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे,माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींची उपस्थिती लाभणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांची राज्यातील ही पहिलीच संयुक्त प्रचार सभा असल्यामुळे या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.

Loading...

या सभेनंतर २३ रोजी परळी येथे राष्ट्रवादीच्यावतीने अशाच पध्दतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.नांदेड येथे होणार्‍या या सभेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येंनी उपस्थित राहावे, असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले आहे.

Loading...

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा : सुधीर मुनगंटीवार

Previous article

हिंजवडीतील आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाकडून हाय अलर्ट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.