Royal politicsमुख्य बातम्या

हिंजवडीतील आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाकडून हाय अलर्ट

0

पुणे,18 फेब्रुवारी (हिं.स.) पुणे जिल्ह्यातील हिंजवडीतील आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली कार्यालयाकडून हा ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी हिंजवडी परिसरातून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तरुण सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत.जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे गेल्या 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आलाय.

केंद्राकडून ‘हायअलर्ट’ मिळाल्यानंतर हिंजवडी येथील ‘आयटी हब’ची सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. हिंजवाडी परिसरात मोठ्या संख्येने परदेशी कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांनाअतिरेकी संघटनांपासून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवनांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Loading...

२० फेब्रुवारी रोजी नांदेड येथे महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा – खा. अशोक चव्हाण

Previous article

❗ये शिवबा ये❗शिवजयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर बोलकी कविता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.